अनिकेत कोथळे खून प्रकरणाची सुनावणी 19 नोव्हेंबर पासून

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली शहर पोलीस ठाण्यात पोलिसांकडून झालेल्या अनिकेत कोथळे खून प्रकरणात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी आज जिल्हा न्यायालयात केसमधील काही कागदपत्रांची पूर्तता केल्याने आता 19 नोव्हेंबर पासून सुनावणीस सुरवात होत आहे.

पोलिसांच्या कृष्ण कृत्याने केवळ राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या अनिकेत कोथळे या तरुणाची सांगली शहर पोलीस ठाण्यात झालेल्या खुनाची सुनावणी दिनांक १९ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. ही सुनावणी सलग तीन दिवस १९ ते २१ नोव्हेंबर अशी चालणार आहे. या प्रकरणातील संशयितांचे वकील अ‍ॅड. प्रमोद सुतार यांनी काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकरणातील सर्व कागदपत्रांची पूर्तता सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केली आहे. त्यामुळे आता या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या खून प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

यावेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या सह सांगली सीआयडीचे डीवायएसपी श्री. मुकुंद कुलकर्णी आणि जिल्हा सरकारी वकील ऊल्हास चिपरे उपस्थित होते.

Visit : Policenama.com