Anil Bhosale | माजी आमदार अनिल भोसले यांच्या जमिनीचा लिलाव, बाजार समितीने खरेदी केली ‘एवढ्या’ कोटी रुपयांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीराव भोसले बँक (Shivajirao Bhosale Bank) गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार (Former MLA) अनिल शिवाजीराव भोसले (Anil Bhosale) यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. अनिल भोसले (Anil Bhosale) यांच्या मालकीची पुणे – सोलापूर महामार्गावरील (Pune – Solapur Highway) कोरेगाव मूळ येथील 13 एकर जमिनीचा लिलाव करण्यात आला आहे. ही जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने (Pune Krushi Utpanna Bazar Samiti) लिलावात (Auction) 6 कोटी 41 लाख 74 हजार रुपयांना खरेदी केली आहे.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड (Administrator Madhukant Gard) यांनी सांगितले की, शहराचा विस्तार वाढत असून प्रस्तावित वर्तुळाकार मार्ग, शेतकरी आणि बाजार घटकांच्या दृष्टीने सोयीस्कर असा उपबाजार बांधण्याचे निश्चित केले आहे. अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या बाजारासाठी आवार उपलब्ध असल्यास शेतकरी तसेच व्यापाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. त्यादृष्टीने बाजार समितीकडून जमिनीची पाहणी करण्यात आली होती.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डाच्या (Shri Chhatrapati Shivaji Market Yard) आवारात गाजर, मटार,
मिरची, फळभाज्या, कांदा, बटाटा असा शेतमाल विक्रीसाठी येतो.
पुणे – सोलापूर रस्त्यावरील कोरेगाव मूळ येथील जमीन उरुळी कांचन रेल्वे स्थानक परिसरात आहे.
त्यामुळे परराज्यातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीस पाठवणे सोपे होईल.
वाहतूक खर्चात बचत होईल तसेच गुलटेकडीतील मुख्य बाजारावर पडणारा ताण कमी होईल, असे गरड यांनी सांगितले.

 

ही जागा जाहीर लिलावाने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदी केली.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली दाखल्यास अनुसरुन बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी अनिल भोसले (Anil Bhosale) यांची कोरेगाव येथील तीन सर्व्हे नंबर, गट नंबरमधील जागा पोटखराब्यासह जप्त केली होती.

 

 

Web Title :- Anil Bhosale | former mla anil bhosle land was purchased from the market committee pune in auction

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा