Pune Crime | बांबुने मारहाण करुन तरुणाचा खून; कोंढव्यातील खडी मशीन येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | किरकोळ कारणावरुन बांबुने मारहाण केल्याने त्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यु (Death) झाला. कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) खूनाचा गुन्हा (Murder In Pune) दाखल करुन एकाला अटक (Arrest) केली आहे. तौसिफ साजीद बागवान Tausif Sajid Bagwan (वय २२, रा. येवलेवाडी, कोंढवा – Kondhwa) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Pune Crime)

 

सुरेश राजू कसोटिया Suresh Raju Kasotia (वय ३२, रा. आंबेडकर नगर, कोंढवा) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ विनोद राजू कसोटिया Vinod Raju Kasotia (वय २९, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७२५/२२) दिली आहे. ही घटना कोंढव्यातील खडी मशीन चौकाजवळील (Khadi Machine Chowk, Pune) मोकळ्या मैदानात १३ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश कसोटिया हा खडी मशीन चौकाजवळील मैदानात असताना तौसिफ बागवान याच्याशी वाद झाला. त्यातून त्याने सुरेश याला बांबुने बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत तो घरी गेला. सुरेश याची आई परिचारिका आहे. त्यांनी सुरुवातीला किरकोळ मार समजून त्याच्यावर घरीच उपचार केले. त्याची प्रकृती गंभीर झाल्यावर सुरेश याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना शुक्रवारी मध्यरात्री त्याचा मृत्यु झाला. हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी जबाब नोंदवून खूनाचा (Murder In Pune) गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस आयुक्त तावरे (Assistant Commissioner of Police Taware) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder of young man by beating him with bamboo; Incident at Khadi Machine in Kondhwa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aadhaar Seva Kendra Location | आधार यूजर्सला मिळणार आतापर्यंतची सर्वात मोठी सुविधा, UIDAI ने केला ISRO सोबत करार

 

DA Arrear | 18 महिन्यापासून अडकलेल्या महागाई भत्त्याच्या एरियरचे काय होणार ? केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आली मोठी अपडेट

 

Chasakman Dam | चासकमान धरणातून विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा