NCP Chief Sharad Pawar | ‘शरद पवार म्हणजे राज्याच्या राजकारणातील ‘बर्म्युडा ट्रँगल’, विजय शिवतारेंचा घणाघात

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle) असून त्यांच्याजवळ जाणारा संपला आहे. पाहिजे तर त्यांचा राजकीय इतिहास तपासा, अशी टीका शिंदे गटाचे नेते (Shinde Group Leader) विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केली आहे. शिवसेना संपवायला शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) जबाबदार असून त्यांना यातून स्वत:चा फायदा करुन घ्यायचा होता, असेही शिवतारे यांनी म्हटले आहे. त्यांना शिवसेना-भाजप युती (Shivsena-BJP Alliance) नको होती. यासाठी त्यांनी भाजपला 2014 मध्ये बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे शिवतारे यांनी म्हटले.

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी कधीच शिवसेनेशी जुळवून घेतलं नाही. पवार यांची मैत्री हिंदूहृदयसम्राट यांच्याशी असली तरी राजकीय मतभेद होतेच. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 2019 मध्ये खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांना संपवत पवार यांच्याकडे जाऊन बसले. शरद पवार राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल असून त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले आहेत, हा इतिहास आहे. मनसेचा 2019 मध्ये एकही उमेदवार नसताना राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना पुढे करत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणायला लावले. गरज संपली की त्यांना झटकून टाकले, असेही विजय शिवतारे यांनी म्हटले.

 

शिवतारे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या भोळेपणाचा फायदा शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतला.
शरद पवार यांचा डाव शनिवारी अखेर यशस्वी झाला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या कटकारस्थानाला जबाबदार
असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेला हा निर्णय दुर्दैवी असल्याचे शिवतारे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, काँग्रेसची (Congress) पंचसूत्री गाडा आणि माझ्यानंतर उद्धवला सांभाळा.
याची आठवण कोणाला आता होत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर असलेली युती तोडा, हे सांगण्यासाठी 16 आमदार गेल्यानंतर तुम्हाला जायचं असेल,
तर तुम्हीपण जा, असे उद्धव ठाकरे आमदारांना म्हणाले होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्यावर काय भानामती केली कुणास ठाऊक, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar responsible for ending shivsena vijay shivtares allegation over frozen shivsena symbol by election commission

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Khaire | मोदींच्या हातात सर्व यंत्रणा, देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचलाय, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप!

Pune Crime | दत्तवाडी परिसरात रिक्षा चालकाचा खून करणार्‍या तिघांना अटक

MP Supriya Sule | ‘हम बेवफा हरगीज ना थे, पर…’ सुप्रिया सुळेंचा टोला, म्हणाल्या-‘मला शिंदे गटाची काळजी वाटते’