Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या 100 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची चौकशी करण्यात आली. यानंतर देशमूख यांना अटक करून न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली होती. यानूसार आज (सोमवारी) देशमुख यांचा न्यायालयीन कोठडीचा कार्यकाळ संपणार होता. यामुळे त्यांना दिलासा मिळणार अशी चर्चा असतानाच न्यायालयाकडून (Court) देशमुख यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

न्यायालयाच्या निर्णयानूसार देशमुख यांना 10 जानेवारीपर्यंत ऑर्थर रोड जेलमध्ये (Arthur road jail) थांबावं लागणार आहे. दरम्यान, बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याने चांदीवाल आयोगाला (Chandiwal Commission) चौकशीदरम्यान देशमुख यांनी गृहमंत्री असताना कोणतीही आर्थिक मागणी केली नव्हती. तसेच त्यांनी कोणत्याही बारमालकांकडून पैसे घेतले नाहीत, असा जबाब दिला होता. परंतु, तरीही मधील काळात अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्या एकाच खोलीतील तासभर भेटीची चांगलीच चर्चा रंगली होती.

 

दरम्यान, 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money laundering case) नोव्हेंबरमध्ये अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली होती. 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

Web Title :- Anil Deshmukh | anil deshmukh judicial custody extended till 10 january 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | हडपसरमधील बंटर शाळेसमोर मोठा अपघात; डंपरने पादचाऱ्याला उडवले

Pune Crime | राज्यात पेपर फुटीची मालिका सुरुच, आर्मी भरती प्रक्रियेचाही पेपर फुटला; CBI कडून 4 जणांना अटक

Monthly Income Scheme | बँकेपेक्षा जास्त मिळेल व्याज, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 1000 रुपये करा जमा

फक्त 9 हजारात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डिस्क ब्रेकसह Yamaha Fascino 125 स्पेशल एडिशन करा खरेदी; मिळेल 68 kmpl मायलेज

CM Uddhav Thackeray | नवीन वर्षात नवं संकट ! कोरोनाची तिसरी लाट? – CM उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ निर्देश

Ramdas Athawale | ‘उद्धव ठाकरेंना बरं होण्यास 2-3 महिने लागतील, मुख्यमंत्र्याचा पदभार देवेंद्र फडणवीसांना द्यावा’ – रामदास आठवले

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 80 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी