Pune Crime | राज्यात पेपर फुटीची मालिका सुरुच, आर्मी भरती प्रक्रियेचाही पेपर फुटला; CBI कडून 4 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | राज्यात पेपर फुटीचे एकामागोमाग एक घोटाळे बाहेर येत आहे. टीईटी (TET), म्हाडा (MHADA) आणि आरोग्य भरती परीक्षेत (Health Recruitment Exam) गैरकारभार झाल्याचे समोर आल्यानंतर आता लष्करी भरती परीक्षेचा (Military Recruitment Exam) पेपर फुटल्याचे (Paper Leak) समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआयच्या अँटी करप्शन युनिटने (Anti Corruption Unit) चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सीबीआयने (CBI) केलेल्या या कारवाईमध्ये एका लेफ्टनंट कर्नलचा समावेश आहे. (Pune Crime)

लष्करी परीक्षेचा पेपर लिक केल्याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा (Lieutenant Colonel Vikas Raizada), हवालदार सुशांत नाहक (Constable Sushant Nahak), शिपाई अलोक कुमार Alok Kumar (सर्व आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC), सदर्न कमांड, पुणे) आणि अलोकची पत्नी प्रियंका यांना सीबीआयच्या (CBI) अँटी करप्शन युनिटनं बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime)

2019 मध्ये सैन्याच्या ‘क’ दर्जाच्या पदांची भरती झाली होती. या परीक्षची ‘अ‍ॅन्सर की’ (Answer Key) आरोपींकडे असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानंतर आरोपींवर नजर ठेवण्यात आली. त्यांचे कॉल रेकॉर्ड (Call Record) करण्यात आले. त्यात चौघांनी 40 ते 50 हजारांत उत्तर पत्रिका विकल्याचे आढळून आले. लेफ्टनंट कर्नल रायझादा आणि हवालदार नाहक हे पुण्यातील सैन्याच्या दक्षिण मुख्यालयात कार्यरत आहेत. तर अलोक कुमार रायझादाच्या ऑफिसमध्ये काम करतो. या चौघांचा 2021 मध्ये झालेल्या सैन्य भरती घोटाळ्यात देखील सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

Web Title : Pune Crime | Lt Colonel Among 4 Booked By CBI For Leaking Indian Army Recruitment Exam Answerkey For Money

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Tukaram Supe | ‘मन:स्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते’ – तुकाराम सुपे

Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार

Pune Crime | खून करुन फरार झालेले 2 अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात

Bigg Boss 15 | तेजस्वी प्रकाशसाठी करण कुंद्राने गुडघ्यावर बसून व्यक्त केलं ‘प्रेम’

Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार

EPF online transfer | ईपीएफ ऑनलाइन ट्रान्सफर करणे झाले आता आणखी सोपे, घरबसल्या करू शकता ट्रान्सफर