Anil Deshmukh | रोहित पवार यांना अटक होईल का?; अनिल देशमुखांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ईडीच्या…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Anil Deshmukh | ईडीने बजावलेल्या समन्सनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी (ED Inquiry) कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईडीकडून सुरू असलेल्या या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh ) यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय तपास यंत्राणांच्या राजकीय वापराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

अनिल देशमुख म्हणाले, केंद्रीय तपास यंत्राणांकडून ठरवून विरोधकांना त्रास दिला जात आहे, विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केले जात आहे. मात्र राष्ट्रवादी पक्ष रोहीत पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.

अनिल देशमुख म्हणाले, ४ वर्षांपूर्वी शरद पवार यांनाही ईडीने नोटीस पाठवली असता शरद पवारांनी सांगितले की मी
स्वत: ईडी कार्यालयात जाईन. तेव्हा तेव्हा लाखो लोक रस्त्यावर आले होते. तेव्हा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी शरद पवारांची भेट घेतली. जो चांगले काम करतो, सरकार विरोधी भूमिका घेतो त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा काढली, त्यामुळे त्यांना त्रास दिला जातोय. असाच त्रास मला, संजय राऊत, नवाब मलीक यांना दिला गेला.

अनिल देशमुख म्हणाले, भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची कारवाई होत नाही. फक्त विरोधकांना टार्गेट केले जात आहे.
ईडीकडे मोठी ताकद आहे, एकदा अटक झाली तर वर्षभर बेल होत नाही. यावेळी रोहित पवारांना अटक होईल का?
असे विचारले असता देशमुख म्हणाले, हे ईडीच्या अधिकाऱ्यांनाच विचारा.

ते पुढे म्हणाले, निवडणूक जवळ येतील तशा कारवाया वाढणार, कितीही त्रास दिला तरी आम्ही खंबीर आहोत.
दिल्ली, झारखंड, पश्चिम बंगाल येथील सरकारला ईडीकडून त्रास दिला जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कोंढवा परिसरातील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 94 वी कारवाई

बहिणीसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन चुलत भावाचा खून, आरोपीसह साथीदाराला वाकड पोलिसांकडून अटक

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, येरवडा परिसरातील प्रकार

संपूर्ण राज्यात हुडहुडी; पुण्यात हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद

हडपसर परिसरात दोन टोळक्यामध्ये राडा, सराईत गुन्हेगारासह 6 जणांना अटक

पुणे : बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल

कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, एकाला अटक; लष्कर परिसरातील घटना

चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

मौजमजेसाठी रिक्षा चोरणारा भारती विद्यापीठ पोलिसांकडून गजाआड, दोन रिक्षा जप्त

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार देणाऱ्या तरुणाला समर्थ पोलिसांकडून अटक