Anil Deshmukh | अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ED च्या कार्यालयात ‘हजर’ (VIDEO)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने (ED) वारंवार समन्स बजावले होतं. मात्र, अनिल देशमुख (Anil Deshmukh) ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यांची पाच कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात विविध वॉरंट जारी करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) त्यांना कोणत्याही प्रकराचा दिलासा देण्यास नकार दिल्याने आज अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले (appeared in the ED office Today) आहेत.

 

 

 

 

मागील अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि त्यांचे कुटुंब गायब होते. अनिल देशमुख यांच्या घरावर चार ते पाच वेळा छापे टाकण्यात आले होते. परंतु देशमुख ईडीसमोर हजर झाले नाहीत.त्यांच्या नागपूर (Nagpur), मुंबई (Mumbai) आणि वर्ध्यातील घरी ईडीने छापेमारी केली. त्यांना अनेकवेळा समन्स बजावण्यात आले. मात्र ते ईडीसमोर हजर न राहता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत होते. त्यांचं म्हणणं ते वकिलामार्फत न्यायालयात मांडत होते. मागील पाच महिन्यांपासून यंत्रणा अनिल देशमुख यांचा शोध घेत होते. मात्र, त्यांचा शोध कोणालाच लागत नव्हता. अखेर आज ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत.

दरम्यान, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पैशांच्या गैरव्यहारप्रकरणी ईडीकडून (ED) मागील अनेक दिवसांपासून नोटीस बजावल्या जात आहेत. त्यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. मात्र अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजार झालेले नाही. दरम्यान, ईडीने समन्स बाजवल्यानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या विरोधात उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचीका (petition) दाखल केली होती. परंतु न्यायालयाने देशमुख यांना मोठा दणका दिला. समन्स (summons) रद्द करण्यास नकार देऊन अर्टकपूर्व जामिनासाठी विशेष न्यायालयात जाण्याची सूचना केली होती.

हे देखील वाचा

LPG Price 1 Nov | ‘एलपीजी’ सिलेंडर 265 रुपयांनी महागला, दिवाळीपूर्वीच फुटला महागाईचा ‘बॉम्ब’

Petrol Diesel Price Pune | सलग सहाव्या दिवशी ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Anti Corruption Bureau Pune | 1 लाखाचे लाच प्रकरण ! पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) वडगाव मावळमध्ये मोठी कारवाई; प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Anil Deshmukh | former home minister of maharashtra anil deshmukh has finally appeared in eds office mumbai today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update