CBI ACB Raid | जीएसटी अधीक्षकाला (GST SP) सीबीआयच्या एसीबी पथकाकडून नाशिकमधून अटक, गेल्या 24 तासात 2 बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – CBI ACB Raid | आदिवासी विभागाचे (Tribal Division) मुख्य कार्यकारी अधिकारी (Executive Engineer) दिनेशकुमार बागुल (Dinesh Kumar Bagul) यांना 28 लाखाची लाच घेताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (CBI ACB Raid) जीएसटीच्या अधीक्षकाला (Superintendent of GST) अटक केली आहे. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या जीएसटी अधीक्षकाचे नाव आहे. लाचलुचपत विभागाने गेल्या 24 तासात दोन मोठ्या कारवाया करुन दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी आदिवासी विभागाचे कार्यकारी अधिकारी बागुल यांना लाच घेताना रंगेहात पकडले. यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता कोट्यावधी रुपयांचे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे. दिनेशकुमार बागुल यांच्या नाशिकच्या घरातून तब्बल 98 लाख 63 हजार तर पुण्यातील घरातून 45 लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. काल रात्री पासून ही कारवाई सुरु असून बागुल यांच्याकडे करोडोची मालमत्ता सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (CBI ACB Raid)

बागुल यांच्यावर कारवाई सुरु असताना दुसरीकडे सीबीआयच्या लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे.
जीएसटी अधीक्षक रविंद्र चव्हाण या अधीकाऱ्याला अटक केली आहे. चव्हाणकडे जीएसटी कर विभीगाचा पदभार आहे.
त्यांना नाशिकच्या सिडको कार्यालयातून (CIDCO Office) अटक करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी भ्रष्टाचारविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे.

 

Web Title :- CBI ACB Raid | 2 big officials in custody of acb in 24 hours crores of money and many more nashik acb news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा