Anil Deshmukh | … तर अनिल देशमुखांना जामिनाचा मार्ग मोकळा; CBI ला कोर्टाचा मोठा झटका ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री (Former Maharashtra Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे मागील काही दिवसांपासून 100 कोटी वसुली प्रकरणात (100 Crore Recovery Case) सीबीआयच्या (CBI) ताब्यात आहेत. पण आता अनिल देशमुख यांचा जामिनासाठीचा (Bail) मार्ग मोकळा झाला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने (Special CBI Court) सीबीआयने केलेली विनंती फेटाळून लावत देशमुख यांना 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पुन्हा एकदा जामिनासाठी प्रयत्न करणार आहेत.

 

शंभर कोटी वसुली प्रकरणाचा तपास (Investigation) सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.
सीबीआयने अनिल देशमुख (Anil Deshmukh ) यांच्यासह त्यांचे सचिव कुंदन शिंदे (Secretary Kundan Shinde) आणि संजीव पालांडे (Sanjeev Palande) आणि सचिन वाझेला (Sachin Vaze) ताब्यात घेतले आहे.
आज या प्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते.
यावेळी अनिल देशमुख यांना सीबीआय न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.
तसेच वाझे, शिंदे आणि पालांडे यांच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ केली.

खंडणी (Ransom) वसुली व मनी लाँड्रिंगच्या (Money Laundering) आरोपाखाली अनिल देशमुख यांना अटक (Arrest) करण्यात आली असून ईडी (ED) व सीबीआय अशा दोन तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सध्या देशमुख हे सीबीआयच्या ताब्यात असून त्यांना आणखी तीन दिवसांची सीबीआय कोठडी मिळावी अशी विनंती विशेष सीबीआय कोर्टाकडे आज करण्यात आली होती.
पोलीस दलातील बदल्या (Police Transfer) आणि नेमणुका याबाबत देशमुख यांच्यावर जे आरोप आहेत त्याची आणखी चौकशी करायची असल्याने ही कोठडी हवी आहे, असे सीबीआयच्या वकिलांनी नमूद केले.
मात्र, ही विनंती कोर्टाने अमान्य केली व देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

 

अनिल देशमुख हे गेल्या 11 दिवसांपासून सीबीआय कोठडीत आहेत.
6 एप्रिल रोजी त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती.
त्यानंतर 11 एप्रिल रोजी आणखी पाच दिवसांची कोठडी वाढवण्यात आली होती.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यासोबत वाझे, शिंदे व पालांडे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
त्यामुळे जामीन अर्ज करण्यासाठी देशमुखांसह सर्वच आरोपींना संधी मिळाली आहे.

 

Web Title :-  Anil Deshmukh | Former Maharashtra Home Minister anil deshmukh remanded in judicial custody by cbi court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा