Anil Deshmukh | मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांना दिलासा नाही ! जामीन अर्ज कोर्टाने नाकारला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन (Bail) मुंबई सत्र न्यायालयाच्या (Mumbai Sessions Court) विशेष पीएमएलए कोर्टाने (Special PMLA Court) फेटाळून लावला आहे. त्यामुळे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 100 कोटींच्या वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांना ईडीने (ED) अटक (Arrest) केली होती. सध्या अनिल देशमुख आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Prison) न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल (Charge Sheet) केले होते. याप्रकरणात अनिल देशमुख यांनी सेशन कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु हा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे.

 

काय आहे प्रकरण ?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Former CP) परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला (Sachin Vaze) प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये वसुल करण्याचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला होता.
यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे (Suspended API Sachin Vaze)
याच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली.
याशिवाय देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे (Private Secretary Sanjeev Palande)
आणि खासगी सहायक कुंदन शिंदे (Private Assistant Kundan Shinde)
यांना देखील याच प्रकरणात दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.

आर्थर रोड जेलमध्ये जबाब नोंदवला
नुकताच सीबीआयने (CBI) अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमध्ये जाऊन जबाब नोंदवला होता.
तसेच याप्रकरणातील संबंधित आरोपींचा देखील सीबीआयने जबाब नोंदवला.
आपल्या जबाबात यांनी काय माहिती दिली याबाबत अ‍ॅड. जयश्री पाटील (Adv. Jayashree Patil) यांनी जास्त बोलणे टाळले.
मात्र भ्रष्टाचार प्रकरणात (Corruption Case) आम्ही लढा देत आहोत, असं त्यांनी म्हटले.
डॉ. पाटील यांनी 21 मार्च 2021 रोजी मलबार हिल पोलीस ठाण्यात (Malabar Hill Police Station) परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी तक्रार दिली होती.

 

Web Title :- Anil Deshmukh | former maharashtra home minister anil deshmukh s bail application rejected by pmla court mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा