माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर आता अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतील आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला ते सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून आज ई फायलिंगद्वारे याचिका दाखल करणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने परमबीरसिंह यांच्या लेटरबॉम्बवर प्राथमिक चौकशीचे आदेश सीबीआयला दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

राजीनाम्यानंतर ते लगेच दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी ज्येष्ठ विधीज्ञ मनु सिंघवी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज ते याचिका दाखल करणार आहेत.