‘बेबो’ करीनाच्या भावाच्या लग्नात63 वर्षीय अनिल कपूरनं केला अफलातून डान्स (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अरमान जैन आणि त्याची गर्लफ्रेंड अनीसा मल्होत्रा 3 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाले. मोठ्या धुमधडाक्यात हे लग्न पार पडलं. या लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या लग्नादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. एका व्हिडीओत तर अभिनेता अनिल कपूर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, अनिल कपूर त्यांच्याच राम लखन सिनेमातील वन टू का फोर गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अनिल कपूर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनाही हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.

https://www.instagram.com/p/B8Hp8l6J5C5/?utm_source=ig_embed

अरमान आणि अनीसाच्या लग्नातील लुकबद्दल बोलायचं झालं तर अरमाननं लग्नात पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती तर गोल्डन कलरचा सेहरा घातला होता. सध्या अनीसा आणि अरमानचे फोटोही सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. अनीसानं लाल कलरचा लहंगा घातला होता. सोबतच तिनं गोल्डन ज्वेलरीही घातली होती. लग्नात आकाश अंबानी, श्लोका मेहता आणि करीना कपूर, करिश्मा कपूर आदी सहभागी झाले होते.