निर्दयी ! माकडाची गळफास लावून केली हत्या

पोलिसनामा ऑनलाईन – केरळमध्ये गर्भवती हत्तीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिल्यामुळे हत्तीणीचा मृत्यू झाल्यीच संतापजनक घटना ताजी आहे. असे असतानाच आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. तेलंगणामध्ये माणुसकीला काळीमा फासणारा एक संतापजनक प्रकार घडला आहे. अम्मापालेम गावात एका व्यक्तीन माकडाची गळफास लावून हत्या केली आहे. घराजवळ माकड फिरत असल्याने अम्मापालेम गावातील वेंकटेश्वर राव याने माकडाची हत्या केली आहे.

घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी वन विभागाने आरोपी वेंकटेश्वरला अटक केली आहे. आम्ही याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली आहे. जो दोषी असेल, त्याला कडक शिक्षा दिली जाईल, अशी माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. वेंकटेश्वर राव या व्यक्तीच्या घराजवळ माकड सतत फिरत होते. त्यामुळे त्रासून त्याने माकडाची गळफास लावून हत्या केली. त्यानंतर अन्य दुसरे एक माकड त्या ठिकाणी आले होते. तेव्हा गावातील काही लोकांनी वेंकटेश्वरला या माकडालाही गळफास लावून मारण्याच उसकावले होते. दुसर्‍या माकडासोबतही वेंकटेश्वर याने तसेच कृत्य करत क्रूरतेचा कळस केला.वेंकटेश्वर इतक्यावरच थांबला नाही. घरातील कुत्र्यांच्या मदतीने इतर माकडांना त्रासही दिला. या सर्व कृत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे.