Ankita Lokhande | “मी गेल्या तीन दिवसांपासून…”; अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने शेअर केल्या वडिलांबद्दलच्या तिच्या भावना

पोलीसनामा ऑनलाइन – मालिका विश्वामधील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिला दोन दिवसांपूर्वी (दि.13) पितृशोक झाला आहे. अंकिताचे वडिल शशिकांत लोखंडे यांचे वयाच्या 68 वर्षी दुखद निधन (Ankita Lokhande Father Death) झाले आहे. सर्व माध्यमातून त्यांच्या आकस्मित जाण्यामुळे शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहली जात आहे. अभिनेत्री अंकिता (Ankita Lokhande) हिने देखील सोशल मीडियावर तिच्या वडिलांवर आधारित मोठी पोस्ट केली असून याखाली कॅप्शनमध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडेंची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे वडील वारल्यानंतर तिने मुलाप्रमाणे तिच्या वडिलांच्या अंतयात्रेस खांदा दिला. आता अंकिताने तिच्या वडिलांबद्दलच्या भावना व प्रेम सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिने वडिलांसोबतचे खास क्षण व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत. तिच्या या व्हिडिओमध्ये फॅमिलीसोबतचे अनेक फोटो आहेत. याखाली तिने मोठे कॅप्शन लिहिले आहे. अंकिताने लिहिले आहे की, “हॅलो, पापा, मी शब्दात तुमचे वर्णन करू शकत नाही. पण मी एवढे नक्कीच सांगू शकते की मी तुमच्यासारखी स्ट्रॉंग, , उर्जेने भरलेली आणि प्रेमळ व्यक्ती पाहिलेली नाही. तुम्ही आम्हाला सोडून गेल्यानंतर तुमच्या बद्दल आणखी काही गोष्टी कळाल्या. तुम्हाला भेटायला आलेले सगळे लोक फक्त तुमची स्तुती करत होते. तुम्ही प्रत्येकाशी वेगळं नातं टिकवून ठेवलं आहे. आता मला कळलं की मी अशी का आहे, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे.”

अंकिताने पुढे लिहिले आहे की, “तुम्ही मला सुंदर आयुष्य, सर्वोत्तम आठवणी आणि समजूदार नातेसंबंध शिकवले. तुम्ही मला कधीच हार मानायला शिकवली नाही. मला नेहमी उंच उडायला पंख दिले आणि आनंदाने आयुष्य जगायला शिकवले. मी तुम्हांला कधीही कुठेही जाऊ देणार नाही कारण तुम्ही माझ्या आत्म्याचा एक भाग आहात.”

अभिनेत्री अंकिताने (Ankita Lokhande) लिहिले आहे की, ‘मी आणि आई गेल्या 3 दिवसांपासून हाच विचार करत होतो की,
उठल्यावर आता करायचे काय. कारण आम्ही दिवसभर तुम्हांला जेवायला काय द्यायचे, वडिलांना कोणती फळे द्यायची,
नाश्ता काय द्यायचा यावरच विचार करायचो. पण तुम्ही आम्हाला सोडून गेल्यामुळे आता आमच्याकडे काहीच उरले नाही.”
अभिनेत्री अंकिता लोखंडेची ही भावनिक पोस्ट वाचून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. तिच्या वडिलांप्रतीच्या भावना आणि
ते गेल्याचे दुःख वाचून सर्वांना वाईट वाटत आहे. तिच्या चाहत्यांनी तिला कमेंट करत स्ट्रॉंग राहण्याचा सल्ला दिला आहे
तर अनेकांनी तिच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tejasswi Prakash And Karan Kundrra | तेजस्वी प्रकाशने सांगितले तिने का केले करण कुंद्रासोबतचे नाते सर्वांसमोर जाहीर; “मला ते करण्याशिवाय पर्याय…”

Nagraj Manjule | नागराज मंजुळे आहेत दत्तक पुत्र, खरे नाव देखील आहे वेगळेच; मुलाखतीमध्ये सांगितले सत्य

Ajit Pawar | मला काय करायचंय, राज ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार भडकले