पिंपळे सौदागर पोलीस चौकीत तोडफोड करणाऱ्यांवर आणखी एक गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

शुक्रवारी रात्री दहा वाजता पिंपळे सौदागर चौकीत लोखंडी पाईपने टेबल, काचेची तोडफोड केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
[amazon_link asins=’B077RV8CCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9fa9b5e3-aea0-11e8-8475-6b874a004d14′]

या प्रकरणी श्रीधर धुंडप्पा कडते (४२, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. तर अनिल गोरख दळवी (३०, रा. रोज लॅन्ड रेसिडेन्सी, पिंपळे सौदागर), अविनाश गोरख दळवी (२५) आणि प्रकाश शिवदास कडभने (२३, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीधर कडते व त्यांची बहीण हे गणेश पान टपरी, कुणाल आयकॉन रोड येथे सिगरेट घेण्यासाठी गेले होते.

सिगरेट घेवून ती ओढत असताना अटक केलेले तिघेजण त्या ठिकाणी आले. या ठिकाणी सिगारेट ओढायची नाही असे म्हणून, काही एक कारण नसताना लाकडी दांडके, सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. तसेच गळा आवळून पोटावर, पाटीवर बेदम मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B06XMYM2PG,B07DQTH81X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a7f23a21-aea0-11e8-b768-4ffce69a47dc’]

तसेच मारहाण केल्याची माहिती कडते हे पोलीस कर्मचारी बोकड यांना सांगत असताना चिडून या तिघानी चौकीत गोंधळ घातला. त्यानंतर बाहेर जाऊन फ्लेक्सची लोखंडी पाईप काढून पोलिसांच्या अंगावर धावून आले. चौकीतील टेबल, खुर्च्यांची तोडगोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. गोळ्या घालून पोलिसांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सांगवी पोलीस करत आहेत.

एल्गार परिषद प्रकरण : पुणे पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ