महाराष्ट्रावर आणखी एका आजाराचं ‘सावट’, स्वत: मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली ‘भीती’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून योग्य त्या उपाय योजना केल्या जात आहेत. तसेच देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यावर कोरोनाचे सावट असताना आणि कोरोनामुळे नागरिक भयभीत झाले असताना आता महाराष्ट्रात आणखी एका नव्या आजाराचे सावट येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: या आजाराबाबत भीती व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ही आणीबाणीची स्थिती आहे. रस्त्यावरील वर्दळ ताबडतोब थांबवा. सर्व डॉक्टर आणि त्यांच्या टीमला मानाचा मुजरा करतो. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर माझं धैर्य वाढले आहे. आपण टप्प्या टप्प्याने पुढे चाललोय. हा जीवघेणा खेळ आहे. बरेच पॉझिटिव्ह रुग्ण बरे होत आहेत. मात्र, आता न्युमोनियाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या रोगाला आपण पहिल्या पायरीवरच रोखत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

काही लोकं क्वॉरंटाईन आहेत त्यांची इतरांनी काळजी घ्या. गरोदर महिला आणि जेष्ठ नागरिकांना विविध आजार असतील तर त्यांना जपलं पाहिजे. गुणाकाराचा काळ आहे तोच आहे आणि याच काळात आपल्याला या रोगाची वजाबाकी करायची आहे. आपल्याकडे औषधांचा तुटवडा नाही. मोठी दुर्घटना घडेल असे काहीही करू नका. ही जिद्द आणि संयम कायम ठेवा. सरकारला कठोर पावलं उचलायला लावू नका. घरातच रहा आपल्याला ही लढाई जिंकायची आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राजनेही दिलासा दिला आणि सूचना केल्या.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे. तसेच राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्व सूचनांच पालन करत आहेत. तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात. विरोधी पक्षही माझ्या सोबत आहे. राजही मला फोन करून दिलासा आणि सूचना देत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.