मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आणखी एका आमदाराचा राजीनामा

आैरंगाबादः पोलीसनामा आॅनलाईन-

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन कन्नड विधानसभा मतदार संघाचे  शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाऊसाहेब चिकटगावकर यांनी देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. भाऊसाहेब हे वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
[amazon_link asins=’B01LXHKR4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f13036e2-9012-11e8-8921-05a396ba725e’]

राज्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले आहे. मात्र अद्याप देखील आरक्षणाच्या विषयावर तोडगा निघत नाही. यावरुन प्रथम हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. काही कालावधीचा लोटत नाही तोपर्यंतच वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.