Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुण्यात दोन लाखाच्या लाच प्रकरणी पोलिस निरीक्षक, सहायक उपनिरीक्षक अन् खासगी व्यक्ती गोत्यात; दोघांना अटक तर पीआय ‘फरार’, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Anti Corruption Bureau (ACB) Pune | दोन लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून खासगी व्यक्तीमार्फत दीड लाख रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी (Pune Bribe Case) पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक चांगलेच गोत्यात आले आहेत. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे तर खासगी व्यक्ती आणि सहायक पोलिस उपनिरीक्षकास ताब्यात घेतलं आहे (Pune Crime). लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील (Lonavala Gramin Police Station) पीआय आणि एएसआयवर अ‍ॅन्टी करप्शनचा ट्रॅप झाला आहे (Pune ACB Trap Case) . त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Anti Corruption Bureau (ACB) Pune)

 

लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक प्रवीण बाळासाहेब मोरे Police Inspector Pravin Balasaheb More (50), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कुतुबुद्दीन गुलाब खान ASI Qutubuddin Gulab Khan (52) आणि यासीन कासम शेख Yasin Kasam Shaikh (58) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसआय खान आणि यासीन शेख याला अटक करण्यात आली आहे.

 

तक्रारदार यांची गॅस एजन्सी आहे. त्यावर कारवाई न करण्यासाठी एएसआय खान याने तक्रारदाराकडे 2 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती (Demand Of Bribe) . तडजोडीअंती दीड लाख रूपये ठरले. लाच घेण्यास पोलिस निरीक्षक मोरे यांनी एएसआय यांना प्रोत्साहन दिले. तक्रारदाराने पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार दाखल केली. त्यानंतर पडताळणी करण्यात आली. शुक्रवारी रात्री ट्रॅप मध्ये यासन शेख हा दीड लाख रूपये घेताना सापडला. त्यामुळे सदरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलिस (Pune Rural Police) दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विजयमाला पवार (DySP Vijaymala Pawar),
पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (Police Inspector Pravin Nimbalkar) , एएसआय मुश्ताक खान,
पोलिस कर्मचारी अंकुश आंबेकर, सौरभ महाशब्दे, पूजा डेरे, दामोदर जाधव आणि चालक चंद्रकांत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारांकडून गुंडावर कोयत्याने सपासप वार, खडकी परिसरातील घटना

 

Pune NCP | शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Facebook पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळेवर कारवाई करा – पुणे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या