Anti Corruption Bureau Ahmednagar | गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन Anti Corruption Bureau Ahmednagar | दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 20 हजाराची लाच मागून 10 हजार रुपये लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Ahmednagar) सापळा रचून अटक केली. अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Ahmednagar) ही कारवाई शनिवारी (दि. 27) श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या (Shrirampur City Police Station) परिसरात केली. संजय किसन दुधाडे Sanjay Kisan Dudhade (वय-38) असे लाच घेताना (Accepting Bribe) रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. संजय दुधाडे हे पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत.

 

याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील हेरगाव येथील 55 वर्षाच्या व्यक्तीने अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Ahmednagar) तक्रार केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दुधाडे हे श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत.
तक्रारदार यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) छेड खाणीचा गुन्हा (FIR) दाखल आहे.
या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी संजय दुधाडे याने तक्रारदार यांच्याकडे शुक्रवारी (दि. 26) 20 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीमध्ये 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

 

तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने शनिवारी (दि.27) पंचासमक्ष पडताळणी केली.
त्यावेळी संजय दुधाडे याने 20 हजार रुपये लाचेची मागणी करुन 10 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारताना दुधाडे याला रंगेहात पकडले.
दुधाडे याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने (SP Sunil Kadasane), अपर पोलीस अधीक्षक सतीश भामरे (Addl SP Satish Bhamre)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना इंगळे (Police Inspector Sadhana Ingle), पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ (Jayant Shirsath),
पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे (Pushpa Nimse), पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, सचिन गोसावी, पोलीस नाईक प्रभाकर गवळी,
पोलीस कॉन्स्टेबल वैभव पांढरे, रवींद्र निमसे, चालक पोलीस नाईक विजय गंगूल, पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Anti Corruption Bureau Ahmednagar | Police personnel caught taking anti-corruption bribe of Rs 10,000 to help in crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Malaika Arora | मलाईकानं ‘स्पोर्टस् ब्रा’मध्ये काढला मिरर सेल्फी, तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांचा वाढला ‘पारा’

Nawab Malik | ‘पब, पार्टी आणि पेंग्विनमुळे महाराष्ट्राची बदनामी’ ! आशिष शेलारांच्या टीकेला नवाब मलिकांचे जोरदार प्रत्युत्तर; दिला ‘हा’ इशारा

Sanjay Raut | संगीत सोहळयात वधूपिता संजय राऊतांचा सुप्रिय सुळेंसोबत ‘डान्स’, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)