Anti Corruption Bureau Latur | 2500 रुपयाची लाच घेताना वीजमंडळाचा कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; लातूरच्या उदगीर तालुक्यात कारवाई

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – वीज जोडणीच्या (power connection) कामासाठी अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारताना (Accepting Bribe) वीजमंडळाच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Latur) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.20) दुपारी लातूर लाचलुचप विभागाच्या पथकाने (Latur Anti Corruption Bureau Latur) हाळी हंडरगुळी येथे केली. याबाबत वाढवणा (बु) पोलीस ठाण्यात (Wadhwana (Bu) at the police station) गुन्हा (FIR)  दाखल करण्यात आला आहे.

 

रहीम पापामियाँ शेख Rahim Papamiyan Sheikh (वय-47) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या टेक्निशियन चे नाव आहे. रहीम शेख हा उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी वीजमंडळात कार्यरत आहे. तक्रारदाराने वीज मीटरसाठी (electricity meter) ऑनलाईन अर्ज केला होता. दरम्यान, केलेल्या ऑनलाई अर्जाच्या अनुषंगाने वीज जोडीसाठी सर्व कागदपत्र उपलब्ध नसल्याचे कारण देत आणि त्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी 2 हजार 500 रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

 

तक्रारीची खातरजमा करुन बुधवारी दुपारी हाळी हंडरगुळी येथे सापळा रचला.
त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून अडीच हजार रुपये घेताना शेख याला रंगेहाथ पकडण्यात आले.
त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण (API Naushad Pathan) यांनी दिली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Latur | employee caught trap bribe taker two and half thousand udgir taluka of latur district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Crime News | धक्कादायक ! महिला सैनिकाची गळफास घेऊन आत्महत्या, ‘त्या’ मेसेजने खळबळ

Gold Silver Update | धनत्रयोदशीपूर्वी 49 हजार रुपयांच्या जवळपास पोहचू शकते सोने, जाणून घ्या काय आहे सर्वात मोठे कारण

High Salary Jobs | देशात पुन्हा परतणार मोठ्या पगाराचा काळ ! सन 2022 मध्ये नोकरदारांना मिळेल 9.3 % पगारवाढ; कंपन्या सुद्धा करतील ‘बंपर’ नियुक्त्या