अबब ! विक्रीकर विभागातील सहाय्यक आयुक्तास 2 लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  अकोला येथील जिल्हा उपनिबंधक आणि विक्रीकर विभागाच्या असिस्टंट कमिशनरला एसीबीने 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली असून, या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सातव्या वेतनआयोगानुसार वेतन निश्चिती व ऐरियसचे प्रस्तावास मान्यता देण्यासाठी ही लाच घेतली आहे.

प्रवीण लोखंडे आणि अमर शेठ्ठी अशी अटक करण्यात आले ल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

अकोला सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक म्हणून प्रवीण लोखंडे नोकरी करतात. तर अकोला विक्रीकर विभागात अमर शेठ्ठी हे असिस्टंट कमिशनर आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांचे व त्यांच्या अधिनस्त असलेले कर्मचारी यांचे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती तसेच एरिअसचे प्रस्तावास मान्यता देण्यासाठी यातील तक्रारदार यांनी त्यांच्याकडे 5 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज दुपारी दोघांना तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून 2 लाख रुपये घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

मात्र यावेळी असिस्टंट कमिशन यांनी लाच घेतल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांना हे दोन लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना 2 लाख रुपये परत केले असल्याचे सांगण्यात आले. पण त्यांना जागीच एसीबीने पकडले.

अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सापळा कारवाई अकोला एसीबीचे उपअधीक्षक एस. एस. मेमाणे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.