Anti Corruption | वारसनोंद करुन उतारा देण्यासाठी 3 हजाराच्या लाचेची मागणी, तलाठी ACB च्या जाळ्यात

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन वडिलोपार्जित शेत जमीनीमध्ये वारसनोंद करुन उतारा देण्यासाठी 3 हजार रुपये लाच मागून 2 हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या तलाठ्याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption) सापळा रचून (Anti Corruption) अटक केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई बुधवारी (दि.1) वरकुटे-म्हसवड तलाठी कार्यालयात केली. दादासो अनिल नरळे adaso Anil Narale (वय-37 रा. पाणवण, ता. माण, जि. सातारा) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या ) तलाठ्याचे नाव आहे.

याप्रकरणी 21 वर्षीय तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे.
या जमीनीमध्ये तक्रारदार आणि त्यांच्या बहिणीचे वारसदार म्हणून नाव नोंदवायचे होते.
वारसदार नोंदणी करुन उतारा देण्यासाठी तलाठी दादासो नरळे याने तीन हजार रुपयाची लाच मागितली. तडजोडीमध्ये दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचुन तलाठी नरळे याला तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (Additional Superintendent of Police Suraj Gurav), सुहास नाडगौडा (Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक अशोक शिर्के, पोलीस नाईक विनोद राजे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Anti Corruption | Demand for bribe of Rs three thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोन्यात घसरणीचा कल सुरूच, चांदीही झाली 515 रुपये स्वस्त, जाणून घ्या आजचे नवीन दर

Pune Crime | बँक खात्यावर चुकून गेले अडीच लाख, पैसे मागायला गेल्यावर घडले असे काही

VPN Service | भारतात बॅन होईल VPN सर्व्हिस, जाणून घ्या पूर्ण बातमी!