Anti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – रेतीच्या ट्रकवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील तहसीलदार (Sonpeth Tehsildar)आणि तहसील कार्यालयातील संगणक ऑपरेटर (Computer operator) इसम यांना 55 हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने (Anti Corruption Trap) रंगेहाथ पकडले आहे. तहसीलदार आशिष कुमार बिरादार (वय-44), खासगी इसम सय्यद इसाक सय्यद रहीम (वय-50) असे लाच (Anti Corruption Trap) घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी 22 वर्षीय व्यक्तीने परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारदार यांचा रेती वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांच्या रेतीच्या ट्रकमधून रेतीची वाहतूक करताना कोणातीही कायदेशी कारवाई करु नये यासाठी तहसीदलार आशिष बिरादार (Ashish Biradar) यांनी 55 हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन अधिकाऱ्यांनी आज सोनपेठ येथील शिवाजी चौकात सापळा रचला.
त्यावेळी तहसीलदार यांच्यासांगण्यावरु तक्रारदार यांच्याकडून 55 हजार रुपयांची लाच स्विकारताना संगणक ऑपरेटर सय्यद रहीम याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर (Superintendent of Police Kalpana Barwakar), अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (Additional Superintendent of Police Archana Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीचे पोलीस उपअधीक्षक निलेश सुरडकर (Deputy Superintendent of Police Nilesh Suradkar), परभणीचे पोलीस उप अधीक्षक भरत हुंबे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Anti Corruption Trap | Tehsildar and computer operator caught in anti-corruption scam while accepting bribe of Rs 55,000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य असल्याचे सिद्ध करणारे पुरावे

Mumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, नवी नियमावली जाहीर

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4,869 नवीन रुग्ण, तर 8,429 जणांना डिस्चार्ज