अनुपम खेर यांचा ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी बुधवारी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ‘व्यस्त वेळापत्रका’ मुळे त्यांनी हा राजीनामा दिला असून अशा प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदावर संधी मिळणे हा माझ्यासाठी सन्मान होता, असे त्यांनी म्हटले आहे.

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची माहिती व प्रसारण मंत्रालयाने नियुक्ती केली होती. मात्र चौहान यांचं सिनेसृष्टीतील योगदान काय? असा सवाल करत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यामुळे बराच वाद झाला होता. मात्र तरीही चौहान यांना अभय देण्यात आलं होतं. चौहान यांची मुदत संपल्यानंतर हे पद सुमारे सहा महिने रिक्त होते. या पार्श्वभूमीवर वाद टाळण्यासाठी खेर यांची२०१७ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. खेर यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली होती. मात्र, आज त्यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही नियुक्ती केली आहे. होती.