हरभजन सिंहनं पाकिस्तानला केलं सावधान, ‘पंगा’ नाही घ्यायचा असं व्हिडीओ शेअर करत सांगितलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग हा अत्यंत आक्रमक खेळाडू मानला जातो. पाकिस्तान विरूद्ध बर्‍याच सामन्यांमध्ये भारताकडून खेळणाऱ्या भज्जीने एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो फार आक्रमक दिसत आहे. व्हिडिओसह भज्जी याने पाकिस्तानसाठी एक संदेशही लिहिला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना मैदानावर नेहमीच गरम वातावरण निर्माण करत असतो. भज्जीने बुधवारी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात त्याने माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरशी झालेली टक्कर दर्शविली होती आणि ‘पंगा मत लेना’ असा संदेशही शेअर केला होता. भज्जीने जुन्या सामन्याचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो मोहम्मद आमिरच्या चेंडूवर षटकार मारत भारताला विजय मिळवून देताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये भज्जी समवेत प्रवीणकुमार दुसर्‍या टोकाला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी दिसत आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज शोएब अख्तरसुद्धा हरभजनला टक्कर देताना दिसत आहे. अख्तरच्या टक्करवर षटकार ठोकल्यानंतरच भज्जींनी एक जोशपूर्ण रिअ‍ॅक्शन दिली. व्हिडिओमध्ये लिहिलेला पंगा नहीं लेना हा अनपेक्षित संदेश पाकिस्तानच्या खेळाडूंसाठीही आहे.

महत्त्वाचे म्हणजे बुधवारी माजी अष्टपैलू युवराज सिंग पाकिस्तानला मदत म्हणून पैसे देण्यामुळे चर्चेत आला. युवीने पाकिस्तानला पैसे दिल्यामुळे चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावर युवराजने स्पष्ट केले की कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी भारतीय आहे आणि नेहमीच राहील.