कोच रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर आणि कुंबळे ‘ऑन स्क्रीन’ MS Dhoni च्या आत्महत्येनं स्तब्ध

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची मोठ्या पडद्यावर भूमिका साकारणारा बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी आत्महत्या केली. ही धक्कादायक बातमी ऐकल्यानंतर कुणालाही विश्वास बसला नाही, क्रीडाजगताशी संबंधीत लोकही ही बातमी ऐकून स्तब्ध झाले आहेत. सचिन तेंडुलकर, प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे, मिताली राज आणि अजिंक्य रहाणेसह अनेक लोकांनी त्याच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे.

भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरला या वृत्तावर अगोदर विश्वासच बसला नाही. त्याने ट्विट करत याबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ही बातमी ऐकून धक्का बसल्याचे म्हटले असून त्यांनी लिहिले आहे की, मला सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने धक्का बसला आहे. मी त्याच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

मिताली राजने म्हटले आहे, हे कुणी सांगू शकत नाही की, हसणार्‍या चार्मिंग चेहर्‍याच्या पाठीमागे किती दु:ख लपले होते. हे खुपच मोठे पाऊल आहे, आम्ही सर्वजण तुला मिस करू. तुझ्या आत्म्याला ईश्वराने शांती द्यावी.

अनिल कुंबळे यांनी लिहिले आहे, ही बातमी ऐकून धक्क्यात आहे, आणि खुप दु:खी आहे. त्याच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे.