सचिन तेंडुलकरच्या जागी सौरव गांगुलीला का बनविलं होतं कर्णधार, माजी मुख्य निवडकर्त्यानं केला खुलासा

ADV

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कर्णधार बनण्यामागील कथेबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. माजी मुख्य निवडकर्ता चंदू बोर्डे म्हणाले की, सचिन तेंडुलकरला कर्णधार व्हायचे नव्हते, अनेक वेळा बोलूनही त्यांनी सहमती दर्शविली नाही. सचिनला आपले पूर्ण लक्ष केवळ फलंदाजीवरच केंद्रित करायचे होते आणि म्हणूनच गांगुलीला टीम इंडियाचे कर्णधारपद देण्यात आले.

चंदू बोर्डे म्हणाले, “जर तुम्हाला आठवत असेल तर आम्ही सचिनला ऑस्ट्रेलियाला कर्णधार म्हणून पाठवले होते आणि तेथे त्याने संघाची कमान सांभाळली. पण जेव्हा तो परत आला तेव्हा त्याला कर्णधार व्हायचे नव्हते.” तो म्हणाला, ‘मला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. मी त्यांना समजावून सांगितलं की, तुम्ही बर्‍याच काळासाठी संघाचा कर्णधार व्हावे कारण आम्हाला या नव्या पिढीकडून नवीन कर्णधार शोधावा लागेल. ”
“आता जेव्हा त्याने सांगितले की, त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. तेव्हा त्याने कर्णधारपद सांभाळावे, अशी अपेक्षा आम्ही बाळगू शकलो नाही. माझे सहकारी माझ्यावर चिडले, त्यांनी म्हंटले कि, तुम्ही त्यांना प्रत्येक वेळी असे समजावून सांगण्याचा प्रयत्न का करता? मी सांगितले की आम्ही भविष्याकडे पहात आहोत पण त्यानंतर आम्ही गांगुलीची निवड केली. ”

ADV

माजी भारतीय क्रिकेट खेळाडू के. श्रीकांतने काही दिवसांपूर्वी गांगुलीच्या कर्णधारपदावर बोलताना म्हटले होते की, तो एक असाधारण कर्णधार होता. गांगुली प्रो- अ‍ॅपक्टिव्ह होता. तो एक असा व्यक्ती होता, ज्याला संघ संयोजन कसे तयार करावे हे माहित होते. क्लाईव्ह लॉयडने 1976 मध्ये वेस्ट इंडिजसाठी विनिंग कॉम्बिनेशन बनविले होते, सौरभने परिपूर्ण संघाला सोबत जोडत त्यांना प्रेरित केले होते, म्हणूनच गांगुली यशस्वी कर्णधार बनला.”