गुगलचा डुडलद्वारे मतदान करण्याचा संदेश

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लोकशाहीतील सर्वात मोठे पर्व असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. यासाठी गुगलने एक डुडल तयार केले असून त्याद्वारे मतदान करण्याचा संदेश देण्यात आला आहे. जगभरातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलने डुडल तयार करुन भारतीय लोकशाहीचा सन्मान केला आहे. मतदान करताना मतदारांच्या बोटावर निळी शाई लावली जाते. असे शाई लावलेले बोट दाखवून डुडल तयार करण्यात आले आहे.

भाजपला पहिल्या टप्प्यातील मतदान महत्वाचे

ADV

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात २० राज्यातील ९१ जागांसाठी आज मतदान सुरु झाले आहे. भाजपसाठी या टप्प्यातील मतदान महत्वाचे ठरणार आहे. या टप्प्यात ज्या जागी मतदान होत आहे. अशा ९१ पैकी ३५ जागा २०१४ मध्ये भाजपने जिंकल्या होत्या. काँग्रेसला ८ जागा मिळाल्या होत्या. तर इतरांना तब्बल ४८ जागा मिळाल्या होत्या. या २० राज्यातील विखुरलेल्या ९१ जागांमध्ये अधिकाधिक जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मागील वेळेपेक्षा अधिक जागा या टप्प्यात मिळाल्या तर त्यांचा बहुमताचा मार्ग सुकर होणार आहे.

त्याचवेळी उत्तर प्रदेश, बिहार अन्य ठिकाणी आज होत असलेल्या मतदानाला लोकांचा उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी सकाळी ११ वाजेपर्यंत जवळपास २५ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे हा उर्त्स्फुत प्रतिसाद कोणाच्या पारड्यात जाणार याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.