Apricots Benefits | तुम्हाला जर्दाळू खाण्याचे फायदे माहिती आहेत का? रोज एवढे खाल्ल्यास होतील अनेक आजार दूर…

पोलीसनामा ऑनलाईन टीम | अनेकांना जर्दाळू हे फळ माहिती नाहीये (Apricots Benefits). जर्दाळू हे एक कठीण कवचीचे फळ आहे. सुकवलेल्या जर्दाळूंचा सुकामेवा (Dryfruit Apricot) म्हणून वापर होतो. जर्दाळू हे दगडी फळे आहे. हे फळ गोलाकार आणि पिवळे, ते लहान दिसतात. हे फळ अत्यंत पौष्टिक आहे आणि याचे शरीराच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत (Apricots Benefits).

जाणून घेऊया जर्दाळू कधी खावे

जर्दाळू खाण्याचे खूप फायदे आहेत, जर्दाळूचा उपयोग आपल्या रोजच्या आहारात केल्यास डोळ्यांच्या दृष्टीपासून (Effective For Eye Sight) कर्करोग पर्यंत गंभीर आजार टाळता येतात. आपण दररोज फक्त 5-6 जर्दाळू खाऊ शकतो. हे रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत घेतले जाऊ शकते. हे दोन्ही वेळेस खाण्याचे अनेक फायदे आहेत (Benefits Of Apricot).

हृदय रोगांवर गुणकारी (Effective To Heart Disease)

जर्दाळू मध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जर्दाळूमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स जसे की व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, बीटा कॅरोटीन (Beta Carotene), लाइकोपीन (Lycopene) इत्यादी हृदयविकाराचे (Heart Disease) प्रमुख कारण असलेल्या फ्री रेडिकल्स चा प्रभाव कमी करतात. याशिवाय जर्दाळू मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

मधुमेहासाठी गुणकारी (Effective To Diabetes)

जर्दाळू मधुमेहासारख्या आजारांशी लढण्यासाठी खूप प्रभावी आहे. जर्दाळूचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. रोज जर्दाळू खाल्ल्याने अनेक फायदे होतात.

पचनासाठी गुणकारी (Effective To Digestion)

जर्दाळूमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर (Fiber) आढळते. जे पचनसंस्था निरोगी ठेवते. यामध्ये कमी कॅलरीस आणि जास्त फायबर असते, ज्यामुळे भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते (Apricots Benefits).

कर्करोगात गुणकारी (Effective To Cancer)

जर्दाळूमध्ये आढळणारे फायटोकेमिकल्स कार्सिनोजेनेसिसला रोखण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, जर्दाळू मध्ये असलेले जीवनसत्व ए (Vitamin A), जीवनसत्त्व सी (Vitamin C) आणि जीवनसत्व ई (Vitamin E) हे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट, फ्री रेडिकल्स सोबत लढून पेशींचे संरक्षण करतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तुमचं सुद्धा अभ्यासात लक्ष लागत नाही का? आळस दूर आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा ‘हे’ 5 उपाय…

‘ही’ समस्या असेल तर, आजपासूनच या लोकांनी खाऊ नका बाजरी…