APY News | ‘या’ सरकारी स्कीममध्ये केवळ 7 रुपये जमा करून दरमहा मिळेल 5,000 चा फायदा, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – APY News | कमी गुंतवणुकीसाठी पेन्शन गॅरंटीसाठी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojna) एक चांगला पर्याय आहे. सध्या अटल पेन्शन योजनेत (APY) सरकार 60 व्या वर्षानंतर 1000 ते 5000 रुपये महीना पेन्शनची गॅरंटी देते. सरकारच्या या स्कीममध्ये 40 वर्षाच्या वयापर्यंत व्यक्ती अर्ज करू शकतो. अटल पेन्शन स्कीममध्ये केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून आहे.
अटल पेंशन स्कीममध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेंतर्गत किमान 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळते. या पेन्शनसाठी योजनेसाठी रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुमच्याकडे सेव्हिंग्ज अकाऊंट, आधार नंबर आणि एक मोबाइल नंबर असावा.
60 व्या वर्षानंतर मिळेल 60,000 रुपए पेन्शन
योजनेंतर्गत अकाऊंटमध्ये दरमहिना एक ठराविक योगदान केल्यानंतर रिटायर्मेंटनंतर 1 हजार रुपयांपासून 5 हजार रुपये मंथलीपर्यंत पेन्शन मिळेल. सरकार दर 6 महिन्यात केवळ 1239 रुपये गुंतवणूक केल्यास 60 वर्षाच्या वयानंतर आयुष्यभर 5000 रुपये महिना म्हणजे 60,000 रुपये वार्षिक पेन्शनची गॅरंटी देत आहे.
अशाप्रकारे दर महिना मिळेल 5000 रु पेन्शन
योजनेत दररोज 7 रुपये जमा करून तुम्ही प्रति महिना 5000 रुपये पेन्शन मिळवू शकता. या योजनेत दर महिना 1000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी प्रति महिना केवळ 42 रुपये जमा करावे लागतील. तर 2000 रुपये पेंशनसाठी 84 रुपये, 3000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4000 रुपये मासिक पेन्शसाठी दरमहिना 168 रुपये जमा करावे लागतील.
कमी वयात सहभागी झाल्यास जास्त फायदा
समजा जर 5 हजार पेन्शनसाठी तुम्ही 35 च्या वयात सहभागी झालात तर 25 वर्षापर्यंत दर 6 महिन्यात 5,323 रुपये जमा करावे लागतील. अशावेळी तुमची एकुण गुंतवणूक 2.66 लाख रुपये होईल, ज्यावर तुम्हाला 5 हजार रुपये मंथली पेन्शन मिळेल. तर 18 व्या वर्षी सहभागी झाल्यास तुमची एकुण गुंतवणूक केवळ 1.04 लाख रुपयेच होईल.
योजनेबाबात महत्वाच्या गोष्टी –
– तुम्ही पेमेंटसाठी 3 प्रकारचे प्लान निवडू शकता, मंथली गुंतवणूक, तिमाही गुंतवणूक किंवा सहामाही गुंतवणूक.
– इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80CCD च्या अंतर्गत यामध्ये टॅक्स सूटचा फायदा मिळतो.
– एका सदस्याच्या नावाने केवळ 1 अकाऊंट उघडेल.
– जर 60 वर्षाच्या अगोदर किंवा नंतर सदस्याचा मृत्यू झाल्यास, पेन्शनची रक्कम पत्नीला मिळेल.
– जर सदस्य आणि पत्नी दोघांचा मृत्यू झाला तर सरकार नॉमिनीला पेन्शन देईल.
Web Title :- APY News | apy daily 7 rupees investment and earn 5k monthly check how
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Price Today | सोनं पुन्हा 1000 रुपयांनी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर