Anti Corruption | 2 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 10 लाख पोलिसानं घेतले; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अपघाताच्या प्रकरणात मदत करण्यासाठी 2 कोटींची मागणी करुन त्यातील 10 लाखांची रक्कम स्विकारताना (accepting a bribe) मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या (Sailu Sub-Divisional Police Office) अखत्यारित काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला (police constable) सापळा रचून (Anti Corruption Trap) रंगेहाथ पकडले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल (sub-divisional police officer Rajendra Gamkaran Pal) यांच्यासह दोघांवर सेलू पोलीस ठाण्यात (Sailu police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे (Anti Corruption Trap) परभणी पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलू पोलीस ठाण्यांतर्गत 3 मे 2021 रोजी एका अपघात प्रकरणी (Accident case) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील मयताच्या पत्नीसोबत तक्रारदाराची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip viral) झाली होती.
9 जुलै रोजी सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल (Sailu Sub-Divisional Police Officer Rajendra Gamkaran Pal)
यांनी तक्रारदारास त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले.
‘तुझी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे.
यातून तुला बाहेर पडायचे असेल तर मला दोन कोटी रुपये द्यावे लागतील’
असे सांगितले. तसेच कार्यालयात वारंवार बोलावून व फोन करुन अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (anti corruption bureau mumbai) कार्यालयात 22 जुलै रोजी तक्रार दिली.
या तक्रारीनुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी 23 जुलै रोजी तक्रारीची पडताळणी केली.
त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल (sub-divisional police officer Rajendra Gamkaran Pal)
यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी करुन तडजोडीत 1 कोटी 50 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर काही वेळाने तक्रारदाराच्या भावाकडून
उपविभीगाय पोलीस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल (sub-divisional police officer Rajendra Gamkaran Pal)
यांच्या कार्यालयाशी संलग्न मानवत पोलीस ठाण्यातील (Manwat police station)
पोलीस कर्मचारी गणेश लक्ष्मणराव चव्हाण (Ganesh Laxmanrao Chavan)
यांना 10 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात (Sailu Police Station) उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल व
पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्या विरोधात शनिवारी (दि.24) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Anti Corruption | parbhani case has been registered against sub divisional police officer Rajendra Gamkaran Pal and police employee in two cores bribe matter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jammu and Kashmir | दहशतवाद्यांविरोधातील सर्च ऑपरेशनमध्ये जवान कृष्ण वैद्य शहीद; कृष्णा घाटी सेक्टरमध्ये चकमकीत 2 अतिरेकी ठार

Pune Crime | पुण्यातील सायकलचोर ‘आशिक’ पोलिसांच्या जाळ्यात, कोरोनाकाळात केले ‘हे’ उद्योग, जाणून घ्या प्रकरण

Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ 12 योजना, ज्यांच्याद्वारे कर्जापासून उपचारापर्यंत मिळतेय लाखो रुपयांची मदत, जाणून घ्या