Arhant Rajendra Joshi-Shiv Chhatrapati Award | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त (ACP) राजेंद्र जोशी यांचे चिरंजीव अरहंत यांना राज्यपालांच्या हस्ते अन् CM एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Arhant Rajendra Joshi-Shiv Chhatrapati Award | क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना राज्य सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र जोशी (Retired ACP Rajendra Joshi) यांचे चिरंजीव अरहंत राजेंद्र जोशी (Arhant Rajendra Joshi-Shiv Chhatrapati Award) यांना स्केटिंग (Skating) मध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्या हस्ते अरहंत जोशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या क्रीडा महर्षि, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde),
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)
आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sports Minister Sanjay Bansode), पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या उपस्थितीत शिवछत्रपती पुरस्कार वितरणाचा (Arhant Rajendra Joshi-Shiv Chhatrapati Award) सोहळा पार पडला.

Advt.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या खेळाडूंना ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली होती.
यात 2019-20, 2020-21, 2021-22 या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात होते.
यामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील 28 खेळाडूंचा समावेश होता. 2019-20 या वर्षाच्या
शिवछत्रपती पुरस्कारामध्ये अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील (Athletics) खेळाडू स्केटिंगचे अरहंत राजेंद्र जोशी
यांना जाहीर झाला होता. अरहंत यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षात करण्यात येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Patil Recruitment | मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत, 47 गावांसाठी होणार भरती

ACB Trap News | 1 लाख 30 हजार रुपये लाच घेताना गटविकास अधिकाऱ्यासह (BDO) तिघेजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात