मलायकाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोचे अर्जुनने मागितले ‘श्रेय’, मलायकाकडून ‘थट्टा’

पोलीसनामा ऑनलाईन – मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघेही त्यांच्या चाहत्यांना खुष ठेवण्यासाठी सोशल मिडीयावर त्यांचे फोटो पोस्ट करत असतात. त्यांनी रविवारही अत्यंत मजेत घालवला. नेहमीप्रमाणेच त्यांनी त्यांचे रविवारचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र यावेळी पोस्ट शेअर केल्यानंर दोघांनीही एकमेकांच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सुरूवातीला मलायकाच्या हॅप्पी संडे पोस्टपासून झाली. तिने ब्लॅक अ‍ॅड व्हाईट फोटो पोस्ट केला आहे. यावर अर्जुनने प्रतिक्रिया देत तिला लिहिले की, ‘ मुली तुझ्या छायाचित्रकारात कौशल्य आहे. याला प्रत्युत्तर देत मलायकाने त्याला टॅग केले आणि लिहिले, ‘हो, चांगली कौशल्ये आहेत’.

यावरुन हे स्पष्ट होते की, अर्जुनने मलायकाचे हे छायाचित्र घेतले होते. आणि तो फोटो काढण्याचे श्रेय त्याला देण्याची मागणी करत होता. काही वेळानंतर अर्जुन कपूरने मलायकाने काढलेले एक चित्र शेअर केले, या चित्राला कॅप्शन देताना त्याने लिहिले आहे, ‘जेव्हा तिने मला हसताना पकडले.’ यावर मलायकाने त्याची मजा घेत तुमचा छायाचित्रकार खूप हुशार आहे.’ अशा प्रतिक्रिया दिल्या.

मलायका-अर्जुनचा सोशल मीडिया पीडीए पाहण्यासारखा असतो. काही दिवसांपूर्वी हे दोघेही मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात भाग घेण्यासाठी ऑस्ट्रेलियात गेले होते. त्यावेळीसुद्धा त्यांनी त्याची छायाचित्रे शेअर केली होती. यावर्षी जूनमध्ये ते न्यूयॉर्कमध्ये सुट्टीसाठी गेले होते. त्यावेळी त्या दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृत कबुली दिली. अर्जुन सध्या त्याच्या ‘पानिपत’या चित्रपट आणि ‘संदीप आणि पिंकी फरार है’ चित्रपटात काम करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like