Arjun Sachin Tendulkar | अर्जुनला खेळण्याची संधी नाही, अखेर मास्टर ब्लास्टर सचिननं मौन सोडलंच; म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Arjun Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंंडूलकर (Arjun Sachin Tendulkar) इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएलच्या (Tata IPL 2022) 15 व्या हंगामात उतरेल अशी आशा होती. मुंबई इंडियन्सने Mumbai Indians (MI) आयपीएलमध्ये एकूण 22 खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. त्यामध्ये अर्जुनला संधी देण्यात आली नाही. त्याचबरोबर आणखी तिघांनाही यातून डावलण्यात आलं. यानंतर सचिन तेंडुलकरने अर्जुनला खास सल्ला दिला आहे.

सचिनने यूट्युब शो सचइनसाईटमध्ये म्हटले आहे की, ”अर्जुनला मी नेहमीच एवढंच सांगतो की सध्याचा मार्ग हा आव्हानात्मक आणि खडतर असणार आहे. तुला क्रिकेट आवडते म्हणून तू क्रिकेट खेळायला सुरुवात केलीस. असे करत राहा आणि मेहनत करत राहा, त्याचे परिणाम नक्कीच समोर येतील.” तसेच, “जर टीम सिलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास, मी संघ निवडण्यात कधीच सहभागी नव्हतो. मी या सर्व गोष्टी टीम मॅनेजमेंटवर सोडतो. कारण मी नेहमीच असंच काम केलंय,” असं सचिननं सांगितलं आहे,(Arjun Sachin Tendulkar)

दरम्यान, अर्जुन तेंडुलकरला मुंबईने आयपीएलच्या पंधराव्या मोसमातील मेगा ऑक्शनमधून तीस लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. अर्जुन 2021 साली ‘पलटण’चा भाग होता. मात्र, तेव्हाही त्याला डेब्यूची संधी मिळाली नाही. दरम्यान, अर्जुनने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी 20 टी-20 सामने खेळले आहेत. परंतु, रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी अर्जुनची संघामध्ये निवड झाली नाही.

Web Title : Arjun Sachin Tendulkar | sachin tendulkar 1st reaction over to
his son arjun tendulakar has not given debut chance in tata ipl 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त