ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला ; 7 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युरोपमधील ऑस्ट्रिया ( Austria) या देशामध्ये दहशतवादी हल्ला ( Terrorist attack) झाला आहे. या हल्ल्यामध्ये जवळपास ७ जणांचा मृत्यू ( Death) झाला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये( Vienna) हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळीबार करण्यात आला आहे. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, य हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये हल्लेखोराचा देखील समावेश आहे.व्हिएन्ना पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यातील जखमींमध्ये अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. एका संशयिताला ठार करण्यात यश आलं असल्याची माहिती ट्विटरवरुन ( Twitter) देण्यात आली आहे.

संशयितांकडून रायफल्सच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गोळीबार होण्यास सुरुवात झाली.सहा वेगवेगळ्या ठिकाणांवरून हल्लेखोर गोळीबार करत होते. या हल्ल्यानंतर सरकारने लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला ऑन अफवांवर विश्वास न ठेवण्याचे देखील आव्हान केले आहे. ऑस्ट्रियाच्या गृहमंत्र्यांनी हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असून लोकांना घऱाबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. तसेच संशयित दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या विशेष दलांना बोलावण्यात आल्याची माहिती दिली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले असल्याचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

अफगानिस्तानच्या काबुल विद्यापीठावर ( Kabul University) दहशतवाद्यांचा हल्ला, १० जणांचा मृत्यू दरम्यान, अफगाणिस्थानमधील काबुल विद्यपीठामध्ये दहशत्वाद्यानी केलेल्या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांना लक्ष्य करुन त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात 40 जण जखमी झाले. विद्यापीठ परिसरात घुसलेल्या दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.