भारतीय सैन्य दलाची मोठी कारवाई ! ‘लष्कर-ए-तोयबा’च्या 8 दहशतवाद्यांना काश्मीरमधून अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये रोज काही ना काही सुरु आहे. पाकिस्तान आणि अतिरेकी कारवायांना परतवून लावण्यासाठी भारतीय जवान नेहमीच सज्ज असतात. भारतीय लष्कराने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत ‘लष्कर-ए-तोयबा’चं आतंकी मॉड्युल पकडण्यात यश आलं आहे.

या कारवाईदरम्यान ‘लष्कर-ए-तोयबा’ संबंधित असलेल्या एकूण 8 दहशतवाद्यांना सोपोरमधून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांचा बारामुल्लातील दुकानदारांना बाजार बंद ठेवण्यासाठी धमकी देणं आणि वादग्रस्त पोस्टर्स लावण्याच्या घटनांमध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे पुढीलप्रमाणे –

1. एजाझ मिर
2. ओमर मिर
3. तौसीफ नाझर
4. इम्तियाझ नाझर
5. ओमर अकबर
6. फैजान लतीफ
7. दानिश हबीब
8. शौकत अहमद मिर

बारामुल्लातील सोपोरमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’साठी काम करणाऱ्या काही लोकांची माहिती गुप्तचर संस्थांच्या हाती लागली होती. ही माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवान आणि पोलिसांनी तातडीनं संयुक्त कारवाई राबवत परिसरात शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत आठ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर आणि त्या बाजूच्या परिसरातील सैन्य हाय अलर्ट वर काम करत आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर भारतीय लष्कराची नजर आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –