Coronavirus : ‘कोरोना’पासून बचाव करण्यासाठी मोठा निर्णय, 23 मार्चपासून लष्कर देखील करणार ‘वर्क फ्रॉम होम’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  देशात कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालल्याने लष्कराने मोठा निर्णय घेतला आहे. लष्कराचे अधिकारी आणि जवानसुद्धा 23 मार्चपासून एक आठवड्यासाठी वर्क फ्रॉम होम करणार आहेत. टप्प्या टप्प्याने ही पद्धत राबवण्यात येईल. लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी शुक्रवारी म्हटले की, लष्कराच्या नव्या अ‍ॅडवायजरीनुसार, 35 टक्के अधिकारी आणि 50 टक्के लष्कराचे जवान 23 मार्चपासून एक आठवड्यासाठी होम क्वारंटाईन राहून घरातून काम करतील.

कोरोना व्हायरसच्या धोक्याला तोंड देण्यासाठी लष्कराने केलेल्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर लष्कर प्रमुखांनी म्हटले की, लष्कराचे अधिकारी आणि जवानांना टप्प्या टप्प्याने वर्क फ्रॉम होम देण्यात येईल. त्यांनी सांगितले की, अधिकारी व जवानांचा एक समुह 23 मार्चपासून एक आठवड्यापासून घरून काम करेल, तर दुसरा समुह 30 मार्चपासून होम क्वारंटाईनचे पालन करेल.