कोट्यावधी रुपयांच्या ‘व्हेल’ माशाच्या ‘उलटी’ची तस्करी करणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई : पोलसीनामा ऑनलाइन – सुगंधी द्रव्य आणि औषध बनवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या व्हेल जातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) कोट्यावधी रुपयांना विकली जाते. १ कोटी ७० लाख रुपयांची व्हेल माशीची उलटी विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला घाटकोपर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राहुल कृष्णाजी दुपारे (वय-५३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

व्हेल जातीच्या माशाची उलटीची विक्री करण्यासाठी कामालेन येथे एकजण येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मैत्रानंद खंदारे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपर पोलीस ठाण्यातील तपासी पथकाने कमालेन येथे सापळा रचला. त्यावेळी एकजण संशयितरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या कापडी पिशवीची तपासणी केली.

कापडीप पिशवीमध्ये १ किलो १३० ग्रॅम वजनाचा गोलाकार आकाराचा काळसर रंगाचा दगडासारखी दिसणारी वस्तू दिसली. या वस्तूची तपासणी केली असता ही वस्तू व्हेल जातीच्या माशाची उलटी असल्याचे निष्पन्न झाले. वन अधिकाऱ्यांना ही वस्तू दाखवली असता त्यांनी देखील ही व्हेल जातीच्या माशाची उलटी असल्याच सांगितले. याची आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी ७० लाख रुपये किंमत आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन
“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय
” टाच ” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like