महाविकास आघाडीतर्फे पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड तर औरंगाबादमधून NCP चे सतीश चव्हाण यांना उमेदवारी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून पदवीधरसाठी अनेक इच्छुक रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, पदवीधारसाठी महाविकास आघाडीतर्फे पुणे विभागातून राष्ट्रवादीचे अरुण लाड याना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर औरंगाबाद विभागातही राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण याना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे हि माहिती दिली.

ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील, याचा आम्हाला विश्वास आहे.

पदवीधरसाठी अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे अनेकांची मनधरणी करण्यात नेते गुंतले आहेत. भाजपने पुण्यातून संग्राम देशमुख याना उमेदवारी दिली आहे तर मराठवाडा मतदार संघात पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे यांना डावलून शिरीष बोराळकर याना उमेदवारी दिल्याने मुंडे नाराज असल्याचे बोलले जात होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेस त्या उपस्थित नसल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, पाटील यांनीच कामानिमीत्त मिंडे बाहेर आहेत त्यामुळे त्या उस्थित राहू शकल्या नसल्याचे त्यांनी सांगत या विषयावर पडदा टाकला होता.