Aryan Khan Drugs Case | ‘शाहरुखकडे 25 कोटींची मागणी?, NCB चे अधिकारी वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही वेळापूर्वी मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) एक नवा ट्विस्ट समोर आला. आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील (Aryan Khan Drugs Case) मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) सध्या फरार आहे. परंतु किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल (Bodyguard Prabhakar Sail) याने किरण गोसावीने शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. साईलच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी प्रभाकर साईल याने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना समीर वानखेडे महणाले, मी प्रभाकर साईल यांच्या आरोपांना योग्य वेळ आल्यानंतर उत्तर देईल.

Chandrakant Patil | भाजपला हरवणे सोपे नाही, BJP चा राष्ट्रवादीला इशारा

प्रभाकर साईलचे आरोप

साईल यांनी गोसावीचे चोरुन लपून व्हिडीओ शूट केले. त्यात गोसावी आर्यन खानला मोबाईलवर बोलायला लावलं असं दिसतंय. यासाठी 25 कोटीची मागणी केली. त्यावर 18 कोटींवर डील झाली आणि मी ऐकलं त्यानुसार समीर वानखेडेंना (Sameer Wankhede) 8 कोटी द्यायचे आहेत असं बोलणं (Aryan Khan Drugs Case) सुरु होतं, असा दावा साईलने केला आहे.

18 कोटींना डील फायनल

साईलने सांगितले की, किरण गोसावी यांच्याकडे 22 जुलै पासून बॉडिगार्ड म्हणून काम करतो. गोसावी कारवाईच्या अगोदर अहमदाबाद वरून निघाले होते. किरण गोसावी पावणेतीनला एनसीबी ऑफिसच्या खाली आले. तेव्हा सॅम नावाच्या एका व्यक्तीचा गोसावी यांना फोन आला. रात्रीतून दोन वेळा त्यांची मिटींग झाली. साडेचारला एनसीबीहून लोअर परळला निघालो. तेव्हा त्यांनी सॅमला फोन केला. फोनवर म्हणाले ‘उनको बोल 25 कोरड में डील करने के लिए. 18 करोड मे फायनल कर. 8 करोड वानखेडे को देना है’ सॅम हा शाहरुख आणि गोसावी यांच्या मधला समन्वयक होता.

हे देखील वाचा

Aryan Khan Drugs Case | ‘किंग’ खान ‘शाहरूख’कडे 25 कोटींची मागणी ! 18 कोटींवर डील झाली; NCB च्या वानखेडेंना 8 कोटी द्यायचे असं बोलणं सुरु होतं, ‘त्या’ बॉडिगार्डचा दावा

Narayan Rane | ‘…नाहीतर लोक बाजूच्या मंत्रालयात जातील आणि ते तर सध्या बंद आहे’

Rupee Bank | रूपी बँकेच्या 4.96 लाख ठेवीदारांना डिसेंबरपर्यंत मिळणार 5 लाख रूपयांपर्यंतच्या ठेवी, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Aryan Khan Drugs Case | aryan khan drug case ncb sameer wankhede reaction on demand 25 crore from shah rukh khan kiran gosavi bodyguard allegations

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update