Asafoetida | पोटदुखीने जगणं अवघड केलंय का? किचनमधील ‘या’ गोष्टीने लवकर मिळेल आराम

नवी दिल्ली : Asafoetida | पोटदुखी ही सामान्य समस्या चुकीचे खाणे ते पोटाचा संसर्ग अशा अनेक कारणांमुळे होते. पोटदुखीमुळे दैनंदिन सामान्य कामांमध्ये अडचणी येतात. त्यावर ताबडतोब उपचार करता येत नसतील तर किचनमधील मसाला उपयुक्त ठरू शकतो (Asafoetida Benefits For Abdomen).

पोटदुखीत हिंगाने मिळेल आराम

हिंग जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरला जातो. परंतु तो पोटदुखीत आराम देऊ शकतो. हे पचनासाठी सर्वोत्तम औषध आहे. तो पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठता देखील दूर करतो. (Asafoetida)

अशा प्रकारे हिंगाचे सेवन करा

हिंग चहा

पोटदुखीत हिंगाचा चहा घ्या. यामुळे ब्लोटिंग आणि अ‍ॅसिडिटी दूर होते. यासाठी एक कप पाणी गरम करून त्यात चिमूटभर हिंग, सुंठ आणि काळे मीठ मिसळून प्या.

कोमट पाण्यात प्या

पोटदुखी दूर करण्यासाठी एक कप गरम पाण्यात हिंग टाका आणि चहाप्रमाणे प्या. यामुळे पचनक्रिया आणि मेटाबॉलिज्म सुधारते.

हिंग आणि आले एकत्र खा

हिंग आणि आले यांचे मिश्रण खाल्ल्याने अपचनाची समस्या दूर होते. पोटदुखीपासून आराम मिळतो. तसेच पोट आणि कंबरेची चरबी वितळू लागते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला,
केसगळतीला लागेल ब्रेक

Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात,
होऊ शकतात 5 मोठे आजार

Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर