Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल, म्हणाले – ‘शिवशाही हा शब्द शिवसेनेने केंव्हाच सोडला; कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहून राज्यात बेबंदशाही’

पोलीसनामा ऑनलाइन टीम (policenama online) – भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार (BJP leader MLA Ad Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) टीकास्त्र सोडल आहे. महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) बळ असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्री स्थगिती देतात? म्हाडाने कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना दिलेल्या सदनिकांच्या चाव्या शरद पवारांच्या हस्ते वाटल्या होत्या. मानवतेच्या या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी एका सहीत स्थगिती दिली. घेतलेला निर्णय कधीही फिरवतात. शिवशाही शब्द शिवसेनेने केंव्हाच सोडला आहे. शिवसेनेचे कॅाग्रेस, राष्ट्रवादी (Congress, NCP) बरोबर मिळून राज्यात जे काही सुरु आहे ती बेबंदशाही सुरु असल्याची टीका आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. Ashish Shelar | bjp leader ashish shelar criticize maharashtra government over vaccination reservation issues ncp

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आमदार आशिष शेलार सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून भाजपतर्फे कुडाळ आणि मालवण येथे मास्क आणि ॲाक्सिमीटर वाटप केले जाणार असून त्याचे शुभारंभ शेलार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांना 3 महिन्याचा थकीत पगार दिला आणि पुन्हा तो परत मागितला? हा काय खेळ सुरु आहे? निर्बंधावरील सूट मंत्री वडेट्टीवार घोषित करतात अन् सीएम कार्यालय निर्णय फिरवते हे काय सुरु आहे?, असा सवाल करत घेतलेला निर्णय कधीही फिरवतात हीच बेबंदशाही सुरु असल्याचे शेलार म्हणाले. राज्यातील कोविड केंद्राची, लसीकरण केंद्राची परिस्थिती अतिशय संतापजनक आहे.

आरोग्य यंत्रणेत अनेक पदे रिक्त आहेत. पालकमंत्री फिरकत नाहीत.
रतन खत्रीचे आकडे लावल्यासारखे सरकारने मदतीचे आकडे सांगितले.
पण निसर्ग आणि तौक्तेच्या नुकसानीची मदत मिळाली नाही.
मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसी आरक्षण, पदोन्नती, शिक्षण अशा विविध प्रश्नांवर सरकारला आम्ही जाब विचारु म्हणून चटावरील श्राद्ध उरकाव अस अधिवेशन सरकार करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
ओबीसी समाजाच आरक्षणाला नख लावण्याच काम याच सरकारातील मंत्री करत असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.

Web Title :- Ashish Shelar | bjp leader ashish shelar criticize maharashtra government over vaccination reservation issues ncp

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर