Ashish Shelar | ‘वेदांताचा प्रकल्प दीड लाख कोटींचा होता, किती टक्के मागितले? 10 टक्क्यानुसार की…’ आशिष शेलारांचा शिवसेनेला सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. प्रकल्प बाहेर गेल्यबद्दल सत्तधारी आणि विरोधक एकमेकांना जबाबदार धरत आहेत. सत्ताधाऱ्यांमुळे प्रकल्प बाहेर केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर यासाठी महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. या प्रकल्पावरुन आता भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. वेदांता कंपनीकडे किती टक्के मागितले? असा सवाल आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला (Shivsena) विचारला आहे.

वेदांता प्रकरणावरुन आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दोन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये शेलार म्हणतात, गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती आणि अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी 10 टक्के लाच (Bribe) द्यावी लागत होती. इतका भ्रष्टाचार (Corruption) बोकाळला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल केल्याची आठवण शेलार (Ashish Shelar) यांनी करुन दिली.

दुसऱ्या ट्वीटमध्ये शेलार म्हणतात, वेदान्ता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता, मग इथे किती टक्के मागितले होते? 10 टक्के नुसारच हिशोब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है! चौकशी झाली पाहिजे… जनतेसमोर सत्य यायलाच हवे, असे मत शेलार यांनी व्यक्त केले आहे.

 

Web Title :- Ashish Shelar |bjp mumbai chief ashish shelar criticized uddhav thackeray by tweeting on vedanta foxconn project