Ashish Shelar on Shivsena | आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले – ‘राणे, राणा दिसतात; मग शेख, पठाण दिसत नाहीत का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ashish Shelar on Shivsena | मागील अनेक दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडत आहे. अशातच आता भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. “राणे, राणा, कंबोज, राणावत यांना महापालिकेकडून घरं तोडण्यासाठी नोटीस दिल्या जात आहेत. गेल्या पंचवीस वर्षात खान, पठाण, शेख यांनी अनधिकृत बांधकाम केलं नाही का ? हा जाती, धर्मभेद नाही; तर अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी आहे,’ असं शेलार यांनी म्हटलं आहे.

 

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ”राज्यातील पोलीस हनुमान भक्तांना, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना पकडण्यासाठी निघालं आहे आणि केंद्रातील पोलीस दाऊदच्या हस्तकांना पकडायला निघालं आहे. हा फरक राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी सरकारच्या कामकाजातील आहे,” अशी टीका त्यांनी केली. (Ashish Shelar on Shivsena)

 

पुढे आशिष शेलार म्हणाले, ”शाहीन बाग आणि जहांगीरपुरीमध्ये आम्ही बुलडोझर बघितले. हे दिल्लीच्या महापालिकेचं काम आहे. पण गेल्या 25 वर्षात नागपाडा, मोहम्मद अली रोड, शेजारी असलेल्या बेहरामपाडा इथे सत्ताधारी शिवसेनेने कधीच बुलडोझर नेला नाही, हा फरक आहे. तसेच, आडनावावरुन कारवाया केल्या जात आहेत, असा आरोप यावेळी शेलार यांनी केला. सरकारने असा भेद करु नये,” असंही ते म्हणाले.

 

”बेहरामपाडा दिसत नाही आणि शाहीन बागवर कारवाई केल्यावर आरडाओरड करता.
राणे दिसतात पण शेख, पठाण दिसत नाहीत. ते अनधिकृत नाहीत असं म्हणायचं आहे का ? आम्ही कोणाच्या विरोधात नाही पण अनधिकृत बांधकामावरील कारवाई आडनावं बघून केली जात आहे.” असा आरोप त्यांनी केला आहे.

 

Web Title :- Ashish Shelar on Shivsena | bjp mla ashish shelar shivsena bmc illegal construction in mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा