Ashok Chavan Resigned | अशोक चव्हाणांनी सोडला काँग्रेसचा हात, भाजपात जाण्याच्या चर्चेवर म्हणाले, ”येत्या दोन दिवसांत…”

मुंबई : Ashok Chavan Resigned | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा (Ashok Chavan Resigned) दिल्याने काँग्रेसला (Congress) राज्यात मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाणांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून ते भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, याबाबत स्वतः अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. (Maharashtra Political News)

अशोक चव्हाण म्हणाले, मी विधानसभा अध्यक्षांना काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याशिवाय प्रदेशाध्यक्षांना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षात नेहमीच प्रामाणिकपणे काम केले. माझी कोणाबद्दलही तक्रार नाही, राजीनामा देण्यामागे व्यक्तीगत भावना नाही. माझी पुढील राजकीय दिशा एक ते दोन दिवसांत स्पष्ट करेन.

भाजपा प्रवेशाबाबत अशोक चव्हाण म्हणाले, मला भाजपाची कार्यप्रणाली माहिती नाही. भाजपात जाण्याचा मी अद्याप निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन.

अशोक चव्हाण म्हणाले, प्रत्येक गोष्टीला कारण असलेच पाहिजे असे नाही. मी जन्मापासून काँग्रेसचे काम केले,
आता मला वाटले अन्य पर्याय पाहिजे म्हणून राजीनामा दिला आहे.

चव्हाण पुढे म्हणाले, मला पक्षातील कोणतीही उणीदुनी काढायची नाहीत. कोणत्याही काँग्रेसच्या आमदाराशी माझे
काही बोलणे झालेले नाही. काँग्रेस सोडणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी मंत्री असताना भाजपासहित सर्व
पक्षांच्या आमदारांना निधी दिला आहे. मी कधीही भेदभाव केला नाही, असे चव्हाण म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार ! शालेय सुविधांसाठी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ची 3 कोटींची मदत

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | गणेशजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम’ ! ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून आयोजन’

Nashik Crime News | किरकोळ वादातून लोखंडी रॉडने हल्ला करुन रिक्षाचालकाचा खून

पिंपरी : खोटी बिले देऊन कंपनीला 24 लाखांचा गंडा, दोन कर्मचाऱ्यांवर FIR

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट

Pune Lonikand Crime | भावजयीचा भावाच्या मदतीने खून करणार्‍यास लोणीकंद पोलिसांकडून अटक

Muder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजजवळ महिलेचा खून

Pune Mundhwa Police | ‘इमानदार’ रिक्षा चालकाने पोलिस ठाण्यात जमा केला 1 लाख 10 हजाराचा ऐवज; मुंढवा पोलिसांकडून रिक्षा चालकाचे कौतुक अन् सत्कार