Ashok Gehlot | समर्थक आमदारांचे राजीनामास्त्र गेहलोत यांच्यावरच उलटणार? अध्यक्षपदाबाबत ही मोठी माहिती आली समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र, गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद आणि अध्यक्षपद दोन्ही हवे आहे. यासाठी त्यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामे (Resignation) देऊन पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालवल्याने हे राजीनामास्त्र गेहलोत (Ashok Gehlot) यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. कारण दबावानंतर गेहलोत यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून वगळले जाण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीत 10 जनपथ या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या निवासस्थानी होणार्‍या बैठकीपूर्वी याबाबतची माहिती समोर आली आहे.

 

अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्षपद अशी दोन्ही पदे हवी आहेत. परंतु काँग्रेसच्या एक व्यक्ती एक पद धोरणानुसार त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. गेहलोत यांच्या जागी सचिन पायलट (Sachin Pilot) मुख्यमंत्री होण्यास पक्षाच्या आमदारांनी विरोध दर्शवला होता. गेहलोत समर्थक आमदारांनी दबावतंत्र वापरत राजीनामास्त्र बाहेर काढले होते.

यानंतर काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी अशोक गेहलोत यांना पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अशोक गेहलोत यांच्या ऐवजी मुकुल वासनिक (Mukul Wasnik), मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge),
दिग्विजय सिंह (Digvijay Singh) आणि के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal)
यांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या एका सदस्याच्या माहितीनुसार, अशोक गेहलोत यांच्या समर्थकांच्या वर्तनामुळे काँग्रेस समोरील अडचणी वाढल्या आहेत.

 

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खासदार शशी थरुर (MP Shashi Tharoor) यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
त्यांनी अर्ज देखील घेतला आहे. अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.
त्या दिवशी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress President Election) कोण कोण असेल हे स्पष्ट होणार आहे.
काँग्रेसचे राजस्थान निरीक्षक अजय माकन (Ajay Makan) आणि मलिल्कार्जून खर्गे यांनी सोनिया गांधी
यांची भेट घेतली असून त्यांना राजस्थानमधील राजकीय स्थितीची माहिती दिली आहे.

 

Web Title :- Ashok Gehlot | rajasthan political crisis congress sources said ashok gehlot may be out of race for the post of congress president

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारची वक्रदृष्टी गोरगरीबांच्या जेवणावर? बंद होऊ शकते शिवभोजन थाळी योजना

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

Popular Front of India (PFI) | PFI च्या रडारवर कोण कोण होतं? महाराष्ट्र ATS कडून खुलासा