Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारची वक्रदृष्टी गोरगरीबांच्या जेवणावर? बंद होऊ शकते शिवभोजन थाळी योजना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | राजकीय द्वेषातून शिंदे- फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) मागील मविआ सरकारचे (MahaVikas Aghadi Government) बहुतांश निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, या राजकारणात राज्याच्या विकासाला झळ पोहोचत आहे. आता राज्य सरकारची वक्रदृष्टी गोरगरिबांच्या जेवणावर पडणार आहे. कारण लवकरच राज्यातील शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) योजना बंद करण्याचा विचार शिंदे-फडणवीस सरकार करू शकते (Maharashtra Politics).

 

शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारने व्यक्त केला आहे. ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसू शकतो. या योजनेतंर्गत राज्यातील गरीब जनतेला 10 रुपयांत जेवण मिळते. कोरोना काळात शिवभोजन थाळी 5 रुपयात मिळत होती.

 

महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात शिवभोजन थाळी सुरू केली होती. सध्या राज्यात एक लाख 88 हजार 463 इतक्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र आहेत. ही केंद्र चालवणार्‍यांना राज्य सरकारकडून मदत दिली जाते. (Maharashtra Politics)

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांच्या नेतृत्वातील सरकार राज्यात आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे.
शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत सरकारने योजनेचा आढावा घेण्याचे ठरवले आहे.
यानंतर योजना चालू ठेवायची की बंद करायची याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

शिवभोजन थाळीची संख्या दोन लाखांपर्यंत नेण्यासाठी ठाकरे सरकारने प्रस्ताव आणला होता.
हा प्रस्ताव शिंदे सरकारसमोर आल्यावर त्यांनी यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.
उलट, ही योजना बंद करण्याच्या दृष्टीने विचार सुरू केल्याचे समजते.

 

Web Title :- Maharashtra Politics | eknath shinde led maharashtra government may be close shiv bhojan thali scheme which is started by maha vikas aghadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | किरकोळ वादातून रिक्षा चालक तरुणाचा निर्घृण खून, हडपसर परिसरातील घटना

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

Popular Front of India (PFI) | PFI च्या रडारवर कोण कोण होतं? महाराष्ट्र ATS कडून खुलासा