अफगाणिस्तान : अशरफ गनी यांना 5 महिन्यानंतर मिळाला राष्ट्रपती निवडणुकीत विजय, दुसर्‍यांदा सांभाळणार सत्ता

काबुल : वृत्तसंस्था – अफगाणिस्तानमध्ये पाच महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रपती अशरफ गनी यांनी दुसर्‍यांचा विजय प्राप्त केला आहे. गनी यांनी आपले मुख्य विरोधी उमेदवार अब्दुल्ला अब्दुल्ला यांचा पराभव केला आहे.

अशरफ गनी यांना निवडणुकीत 50.64 टक्के मते पडली आहेत. तर अब्दुल्ला अब्दुल्ला यांना 39.52 टक्के मिळाली. मतपत्रिकांची मोजणी आणि तांत्रिक अडचणींमुळे निकाल जाहीर होण्यास खुप उशीर झाला.

याबाबत निवडणुक आयोगाचे प्रमुख हवा आलम नूरिस्तानी यांनी काबुलमध्ये म्हटले की, आयोग 50.64 टक्के मते मिळवणारे अशरफ गनी यांना अफगाणिस्तानचे राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात आले आहे. गनी यांचे मुख्य प्रतिस्पर्धी अब्दुल्ला यांनी मतदानात गडबड झाल्याचा आरोप केला होता. यामुळे पुन्हा मतमोजणी केल्याने निकाल येण्यास सुमारे पाच महिने उशीर झाला.