Asia Cup 2023 | गौतम गंभीरसाठी भारत-पाकच्या मॅचमधील ‘सामनावीर’ कोणी दुसराच; मांडलं स्पष्ट मत

पोलीसनामा ऑनलाइन – Asia Cup 2023 | आशिया कप 2023 ची क्रिकेट स्पर्धा रंगात आली असून सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यामुळे याची रंगत अधिक वाढली आहे. भारताच्या टीमने पाकिस्तानच्या टीमचा दारूण पराभव करत विक्रमी विजय मिळवला. हा विजय वन डे इतिहासातील भारताचा पाकिस्तानवर मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला आहे. देशभरातून आनंद आणि जल्लोष व्यक्त केला जात आहे. या सामन्यामध्ये विराट कोहली, लोकेश राहुल आणि कुलदीप यादवच्या खेळीने हा टीम इंडियाचा विजयश्री खेचून आणला. विराट आणि के. एल. राहुल यांच्या शतकीय खेळीने आणि कुलदीपच्या 5 विकेट्सने सर्वांना आश्चर्यचकित केले. दरम्यान, विराट कोहलीला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले, परंतु टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला कोहलीला देण्यात आलेल्या या पुरस्काराने आनंद झालेला दिसला नाही. (Asia Cup 2023)

टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा त्याच्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असतो. अनेकदा तो आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीमध्ये देखील सापडतो. यावेळी देखील त्याने काल झालेल्या आशिया कप 2023च्या भारत- पाकिस्तान मॅचमध्ये विराट कोहली याला देण्यात आलेल्या ‘मॅन ऑफ द मॅच’ किताबावर आक्षेप घेतला आहे. विराट कोहलीने काल झालेल्या मॅचमध्ये 94 बॉलमध्ये 122 धावा केल्या असून 9 चौकार 3 षटकार अशी उत्तम खेळी खेळली. त्याच्या स्ट्राईक रेड 129.78 सरासरी होता. विराट आता वनडेमध्ये सर्वात जलद 13,000 धावा करणारा फलंदाज बनला आहे. कोहलीने वन डे सामन्यांमध्ये एकूण 47 शतके झळकवली असून तो आता सचिनच्या वनडे शतकाची बरोबरी करण्यापासून फक्त दोन शतके दूर आहे. त्याचबरोबर त्याने राहुलसोबत आशिया चषकात 233 धावांची सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम देखील केला आहे. विराट कोहलीच्या या विक्रमी खेळीनंतर त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ ने गौरवण्यात आले. पण गौतम गंभीरच्या मनात कालचा सामनावीर कोणी दुसराच होता. गौतम गंभीरने त्याचे स्पष्ट मत मांडले आहे. (Asia Cup 2023)

पाकिस्तान आणि भारताच्या सामन्यामध्ये गोलंदाज कुलदीप यादव याने 8 षटकांत 25 धावा देऊन 5 बळी घेतले.
यामुळे गौतम गंभीरसाठी कुलदीप यादव सामनावीर असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
गौतम गंभीर म्हणाला की, “कुलदीपशिवाय मला या पुरस्कारासाठी दुसरे कोणी दिसत नाही.
कारण त्याने पाकिस्तानी फलंदाजांची अवस्था बिघडवली होती. मला माहीत आहे की, विराट आणि राहुल या दोघांनी शतके झळकावली आहेत. रोहित आणि गिलनेही अर्धशतके झळकावली आणि तीही अशा विकेटवर जिथे चेंडू स्विंग होत होता. पण जर कोणी 8 षटकांत 5 विकेट्स घेत असेल आणि तेही पाकिस्तानविरुद्ध तर ती खरंच मोठी गोष्ट आहे. कारण पाकिस्तानी फंलदाज फिरकीला चांगले खेळतात. मला माहित आहे की जर हा ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघ असता तर गोष्ट वेगळी असती. कारण हे देश फिरकी नीट खेळत नाहीत. पण हा पाकिस्तान होता. कुलदीपने प्रत्येक फलंदाजाला बॅकफूटवर ढकलले. या लाइनअपसह वर्ल्ड कपमध्ये जाणे भारतासाठी खूप छान आहे कारण भारताकडे दोन आक्रमक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि कुलदीप आहे.” असेही गौतम गंभीर म्हणाला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना गुन्हे शाखेकडून 24 तासात अटक, साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

Manoj Jarange-Maratha Reservation | मी दोन पावलं मागे जातोय…कारण, मनोज जरांगे यांची माहिती; आंदोलनाची पुढील दिशाही सांगितली

Pune PMC Anti Encroachment Drive | भांडारकर रस्ता व कमला नेहरू पार्क परिसरातील हॉटेल्स व कॅफेंचे अनधिकृत बांधकाम पाडले